
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डॉ दीपक शिंदे यांची पंजाब राज्यातील चंदीगड विद्यापीठ चंदीगड येथील पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या अभ्यास मंडळावर निवड करण्यात आली आहे.
नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे यांची चंदीगड विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विषयाच्या अभ्यास मंडळावर तज्ज्ञ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे यांची पंजाब राज्यातील चंदीगड विद्यापीठ चंदीगड येथील पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या अभ्यास मंडळावर निवड करण्यात आली आहे. डॉ. दीपक शिंदे हे सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व गोंडावना विद्यापीठ गडचिरोली येथील पत्रकारिता व जन संवाद या विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत, या व्यतिरिक्त ते महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, गुरु गोबिंद सिंघजी इंद्रप्रस्थ विद्यापीठ दिल्ली, विश्व भारती विद्यापीठ शांतीनिकेतन कलकत्ता, कल्याणी विद्यापीठ नाडिया प. बंगाल, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ या विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्त आहेत.
हेही वाचा - नांदेडकरांसाठी गुड न्यूज : रक्त पिशवीच्या दराबाबत आता दर निश्चित -
डॉ शिंदे यांनी यापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद, मुंबई विद्यापीठ मुंबई, मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठ हैदराबाद यांच्या पत्रकारिता विषयाच्या अभ्यास मंडळावर काम केले आहे तर अभ्यासक्रम निश्चिती करण समिती सोलापूर विद्यापीठ सोलापूर व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट अँड इंटर डीसीप्लिनरी स्टडिज या महत्वाच्या समितीवर काम केले आहे. डॉ. शिंदे हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, अधी सभा, विद्या परिषद, ग्रंथालय समिती या समित्यावर काम केले आहे सध्या अभ्यास मंडळ वगळता परीक्षा मंडळाचे सदस्य, सेट परीक्षा समन्वयक म्हणून ते काम करत आहेत. यासोबतच जिल्हा प्रशासनाच्या covid- 19 मीडिया मॉनिटर कमिटी व निवडणुकीच्या माध्यम प्रामाणिकरण समिती वर काम करत आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ व राष्ट्रीय मुक्त व्यावसायि संस्थेचे पत्रकारिता विषयांचे अभ्यासक्रम त्यांनी तयार करून दिले आहेत. त्यात डॉ. शिंदे यांनी लिहिलेले चॅप्टर आहेत. चंदीगड विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड झाल्याबद्दल डॉ शिंदे यांचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले, प्र कुलगुरू डॉ. बिसेन, कुलसचिव डॉ सर्जेराव शिंदे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
|