esakal | कंधार तालुक्यात बोरी (बु ) येथील स्वस्त धान्य दुकानदाराची मनमानी; लाभार्थी वंचीत

बोलून बातमी शोधा

फुलवळ ग्रामपंचायत
कंधार तालुक्यात बोरी (बु ) येथील स्वस्त धान्य दुकानदाराची मनमानी; लाभार्थी वंचीत
sakal_logo
By
धोंडिबा बोरगावे

फुलवळ ( जिल्हा नांदेड ) : कंधार तालुक्यातील बोरी (बु ) येथील स्वस्त धान्य दुकानदार किशन मारोती मुळे यांच्याकडून गेली चार वर्षांपासून गावकऱ्यांची पिळवणूक होत असून जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे. या संबंध प्रकरणाची लेखी तक्रार गावकऱ्यांनी सोमवारी (ता. तीन) मे रोजी तहसीलदार कंधार यांच्याकडे केली असून त्या तक्रारी निवेदनावर जवळपास २५ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

गावकऱ्यांनी दिलेल्या लेखी तक्रारी निवेदनात असा उल्लेख करण्यात आला आहे की, निवेदनकर्ते आम्ही बोरी (बु ) येथील रहिवासी असून येथील स्वस्त धान्य दुकानदार किशन मुळे हे मागील चार वर्षांपासून गावकऱ्यांना रेशन दुकानचा माल वाटप करताना आम्ही घेतलेल्या मालाची रीतसर पावती न देता जास्तीचे पैसे घेत असून गावकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. आणि खरेदी केलेल्या मालाची पावती ग्रामस्थांनी मागितली असता उडवा- उडवीची उत्तरे देत आहेत. एवढेच नाही तर दुकानसमोर भाव फलक ही लावलेला नाही तो पण तात्काळ लावण्यास भाग पाडावे असेही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.

हेही वाचा - रमजान विशेष : लैलतुल कदर पवित्र रात्रीची इबादतने रमजानच्या तिसऱ्या पर्वास प्रारंभ

संबंधित अधिकारी यांनी तात्काळ आमच्या निवेदनाचा विचार करुन गावकऱ्यांची होत असलेली पिळवणूक थांबवावी अशी विनंती ही गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. सदर निवेदनावर गुरुनाथ वाघमारे, रोहिदास फड, माधव व्यवहारे, बालाजी वडजे, माधव वडजे, बाबू मठपती, इतिहास कुलकर्णी, प्रल्हाद मठपती, साईनाथ फड, माधव सांगवे, चांदू गायकवाड, माधव बेंद्रे, पंढरी व्यवहारे, दिलीप सांगवे, मन्मथ मठपती, संभाजी फड, मारोती वाघमारे, दत्ता वाघमारे, मधुकर वाघमारे, नंदाबाई व्यवहारे, गोविंद बोरकर, हरी गंगावणे, तुळशीदास व्यवहारे, मारोती जुंबाड, गणेश बोरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे