Maratha Reservation : अर्धापुरात सहा गावांतील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण

सहा गावांतील तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला सुरुवात केली
ardhapur 6 village youth protest for maratha reservation marathi news
ardhapur 6 village youth protest for maratha reservation marathi newssakal

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तालुक्यात दुसऱ्या टप्प्यांतील आंदोलनाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला असून आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या आंदोलनाची धग लोकप्रतिनिधींना बसत असून जिल्ह्यात फिरणे अवघड झाले आहे. तालुक्यातील सहा गावांतील तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.

तसेच गावोगावी लोकप्रतिनिधींना प्रवेश बंद केला असुन तालुक्याच्या सिमेवर प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले आहेत.कॅंडल मार्च काढुन आरक्षणाची मागणी केली जात आहे.तर राष्ट्रीय महामार्ग ६१वर संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी जमीत अर्धे गाडुन घेत उपोषण केले आहे.

अर्धापूर तालुक्यात‌ मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तब्बल महिनाभर साखळी उपोषण करण्यात आले होते.या आंदोलनाला प्रत्येक गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आंदोलनात सहभागी झाले होते.बैलगाडी,जीप, ट्रॅक्टर रॅली काढून साखळी उपोषणात सहभागी झाले होते.विविध मार्गाणी आंदोलन करून प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधून घेतले होते ‌‌तसेच उपोषणस्थळी कीर्तन भजनातून‌ आरक्षणाच्या मागणीचा गजर करण्यात आला.

आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यांतील आंदोलनाला सुरुवात केली असून ते उपोषणाला बसले आहेत.त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून. अर्धापुरात लोकप्रतिनिधींना प्रवेश बंदी, उपोषण कॅंडल मार्च काढुन आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे.

तालुक्यातील पिंपळगाव,शैलगाव, मालेगाव, कोंढा, गणपूर,शाहपूर आदी गावांतील तरुणांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.या उपोषणाला नागरिकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने आप आपल्या गावात आतम राजेगोरे, ऋषीकेश राजेगोरे, प्रल्हाद इंगोले, ईश्वर पाटील इंगोले, प्रमोद इंगोले , अंजनाबाई आबादा,र माधव जाधव, गोविंद आबादार ,श्रीधर आंबोरे, कपील कोंढेकर, गजानन लबडे आदी तरुणांनी उपोषण सुरू केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com