
तालुक्यातील सुमारे 65 हजार 329 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदारांनी निर्भयपणे मतदानचा हक्क बजवावा असे आवाहन प्रशासनच्या वतीने करण्यात आले आहे.
अर्धापूर (जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या 118 वार्डमधील 292 जागांसाठी 712 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असून शुक्रवारी (ता. 15) रोजी होणा-या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही मतदान प्रक्रिया तालुक्यातील 130 मतदान केंद्रावर पार पडणार आहे. तालुक्यातील सुमारे 65 हजार 329 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदारांनी निर्भयपणे मतदानचा हक्क बजवावा असे आवाहन प्रशासनच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी थंडावल्या आहेत. गावाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचा फैसला मतदार शुक्रवारी देणार आहेत. मतदानाचे तीळगुळ मतदार कोणाला देणार व कोणावर संक्रांत येणार हे सोमवारी (ता. 18) मतमोजणी झाल्यावर स्पष्ट होणार आहे.
तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीपैकी 43 ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीपैकी सहा ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध झाली आहे. तर 67 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या 297 जागांसाठी 712 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तालुक्यातील 130 मतदान केंद्रावर शुक्रवारी (ता. 15) मतदान प्रक्रिया पार पडेल.
मतदानाच्या प्रक्रिया पारपाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक मतदानकेंदाध्यक्ष व चार आसे पाच अधिकारी आसणार आहेत. तसेच बारा झोन तयार करण्यात आले असून तितकेच झोनल अधिकारी राहतील तसेच राखीव कर्मचारी व अधिकारी राहतील आशी माहिती निवडणूक विभागाने दिली.
निवडकणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात एक पोलिस निरीक्षक, सात पोलिस उपनिरिक्षक, 109 पोलिस कर्मचारी 65 होमगार्ड, एक राज्य राखीव दलाची तूकडी आसा पोलीस बंदोबस्त असेल. तसेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी दिडशेच्यावर व्यक्तीवर विविध कलामांखाली प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांनी दिली. तर मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मारोतराव जगताप यांनी केले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे