कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतक-याची आत्महत्या

लक्ष्मीकांत मुळे
Saturday, 21 November 2020

शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीच्या यादीत आपले नाव आले नाही. यामुळे ते निराश झाले. या परिस्थितीला कंटाळून त्यांनी आपल्या मालकीच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली, अशी माहिती मयत शेतक-याचा चुलत भाऊ दिंगबर धुमाळ यांनी दिल्यावरून अर्धापूर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.

अर्धापूर (नांदेड ) : तालुक्यातील शेणी येथील एका शेतक-याने आपले शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्यामुळे निराश झालेल्या शेतक-यांनी आपल्या मालकीच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता 21) सकाळी झाली आहे. मयत शेतक-यांने अर्धापूर शहरातील एका राष्ट्रीयकृत बॅकेतून कर्ज घेतले होते. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे

या घटनेबाबत पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, शेणी येथील शेतकरी सुरेश बाबाराव धुमाळ (वय 50) या शेतक-याने अर्धापूर शहरातील एक राष्ट्रीयकृत बॅकेतून सुमारे पाच लाखांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज कसे फेडावे ही चिंता शेतकरी धुमाळ यांना होती.

तसेच सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडणे अवघड झाले होते. शेती विकून ही अर्थिक परिस्थिती सुधारली नाही. अशी परिस्थिती असताना शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीच्या यादीत आपले नाव आले नाही. यामुळे ते निराश झाले. या परिस्थितीला कंटाळून त्यांनी आपल्या मालकीच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली, अशी माहिती मयत शेतक-याचा चुलत भाऊ दिंगबर धुमाळ यांनी दिल्यावरून अर्धापूर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.

या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक के. के. मांगुळकर हे करित आहेत. मयत शेतक-याच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, चार मुली, नातु, पंतू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ardhapur a farmer has committed suicide as his name is not in the debt waiver list