अर्धापुरात दोघांची गळफास घेवून आत्महत्या,तर दिव्यांगाचा कालव्यात पडून मृत्यू

लक्ष्मीकांत मुळे
Wednesday, 13 January 2021

अर्धापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. या तिन्ही घटना मंगळवारी (ता. 12) दुपारनंतर घडल्या आहेत.

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यात तिघांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला असून अर्धापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. या तिन्ही घटना मंगळवारी (ता. 12) दुपारनंतर घडल्या आहेत.

याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, निमगाव (ता. अर्धापूर ) येथील दिव्यांग तरुण आकाश सुभाष सुर्यवंशी (वय 21 ) हा मंगळवारी (ता. 12)  दुपारी हातगाड्यावरुन अर्धापूरला येत आसतांना त्यांचा तोल गेला व ते अर्धापूर शिवारातील गोपाळ भुतडा यांच्या शेताजवळील कालव्यात पडला. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना झाली. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा कोणाला निवडणुकीचं येड तर कोणाला पोट भरण्याचं कोड

दुसऱ्या घटनेत शहरातील कृष्णनगरमध्ये राहणारे श्याम गोपीचंद गिरी (वय 28 ) यांनी अर्धापूर शिवारातील कलंदरखान यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे..

कामठा (ता. अर्धापूर ) येथील लक्ष्मण राणोजी वाघमारे (वय 46) या गावातील आपल्या राहत्या घराच्या पाठीमागील लिंबाच्या झाडाच्या फांदीला मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ardhapur, two committed suicide by strangulation, while Divyanga fell into a canal and died nanded news