
या हल्ल्यात चाकु व दगडांचा वापर करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांविरूद्ध उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला
सोशल माध्यमावर बदनामी करतोस काय ? म्हणून...
नांदेड : सोशल माध्यमावर बदनामीकारक वक्तव्य केल्याचा राग मनात धरुन एकावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चाकु व दगडांचा वापर करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांविरूद्ध उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना सावळेश्वर फाटा (ता. कंधार) येथे रविवारी (ता. १४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
नंदनवन (ता. कंधार) येथील योगेश उत्तमराव हुंबाड (वय २७) यांनी फेसबुक व सोशल माध्यमावर कापसाच्या प्रश्नावर स्थानिक नेते मुग गीळून गप्प बसल्याचा आरोप करत थेट लाईव्ह आपले मत मांडले. यावेळी आपल्या नेत्याच्या विरोधात बोलणाऱ्या योगेश हुंबाड यांची बोलेरो गाडी सावळेश्वर फाटा येथे हल्लेखोरांनी अडविली. गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या. श्री. हुंबाड यांना बेहर ओढून चाकुने व दगडाने जबर मारहाण केली. यात ते जखमी झाले.
हेही वाचा - अक्षदा पडण्याअगोदर नवदाम्पत्यानी याला दिले महत्व
उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचेही नुकसान केले. जखमी अवस्थेत योगेश हुंबाड यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर श्री. हुंबाड यांनी उस्मानगनर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सतीश दिगंबर पवळे, गंगाधर महाजन गायकवाड, सतीश व्यंकट पवळे आणि दत्ता मधूकर कदम रा. चिखली (ता. कंधार) यांच्याविरुद्ध संगनमताने प्राणघातक हल्ला यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे करत आहेत.
विश्वास वाघमारे आकाशवाणीचे नवे कार्यक्रम अधिकारी
नांदेड : केंद्रीय प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत चालविण्यात येणाऱ्या आकाशवाणी नांदेड केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी पदाचा पदभार विश्वास वाघमारे यांनी नुकताच स्विकारला आहे. मूळचे नायगाव तालुक्यातील असणारे विश्वास वाघमारे नांदेड आकाशवाणीचे स्थानिक पहिलेच कार्यक्रमाधिकारी ठरले आहेत.
माहिती मनोरंजन आणि शिक्षण अशी त्रिसूत्री घेऊन अवह्यात कार्यक्रम प्रसारण करणाऱ्या नांदेड आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी नंदादीप बट्टा यांची रत्नागिरी येथे बदली झाल्यानंतर विश्वास वाघमारे यांची कार्यक्रम अधिकारी तथा कार्यालय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नायगाव तालुक्यातील सावरगाव येथील मूळचे रहिवाशी असणारे विश्वास वाघमारे हे आकाशवाणीचे नांदेड जिल्ह्यातील पहिलेच कार्यक्रम अधिकारी ठरले आहेत.
येथे क्लिक करा - २०० खाटांचे केअर सेंटर लवकरच सुरू होणार
स्थानिक कलावंतांना जास्तीत जास्त संधीसाठी प्रयत्न
स्टाफ सेलेक्शन कमिशन द्वारा घेण्यात आलेल्या २०१५ च्या परीक्षेत ते उतिर्ण झाले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून नांदेड आकाशवाणीत ते कार्यरत आहेत. संयमी आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नांदेड आकाशवाणी केंद्र दर्जा उंचावून स्थानिक कलावंतांना जास्तीत जास्त संधी देण्याचा आपला प्रयत्न राहील अशी माहिती त्यांनी दिली.
Web Title: Are You Defaming Social Media So Nanded News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..