दारूवरून झाला वाद, पुढे काय झाले वाचा...

बाबूराव पाटील
Wednesday, 19 August 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोकरपासून जवळच असलेल्या नारवट येथील रहिवासी गणपत देविदास वागतकर (वय ३०) हा गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्ताने तेलंगणात होता. पोळ्यानिमित्त तो गावाला आला होता. भोकर नांदेड रस्त्यावरील बालाजी नर्तावार यांच्या धाब्यावर सोमवारी मित्र लक्ष्मण खुपसे (रा. नारवट) याच्यासोबत तो दारू पीत बसला. तेथे गणपत आणि लक्ष्मण यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात लक्ष्मणने गणपतचा शर्टाने गळा आवळला. त्यात गणपतचा जागीच मृत्यू झाला.

भोकर, (जि. नांदेड) ः भोकर - नांदेड रस्त्यावरील एका ढाब्यावर दारू पिण्यावरून सोमवारी (ता.१७) रात्री दोन तरुणांत वाद झाला. रागाच्या भरात एकाने शर्टाने गळा आवळून सहकाऱ्याचा खून केला‌. याप्रकरणी मंगळवारी (ता.१८) रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

गणपतचा शर्टाने गळा आवळला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोकरपासून जवळच असलेल्या नारवट येथील रहिवासी गणपत देविदास वागतकर (वय ३०) हा गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्ताने तेलंगणात होता. पोळ्यानिमित्त तो गावाला आला होता. भोकर नांदेड रस्त्यावरील बालाजी नर्तावार यांच्या धाब्यावर सोमवारी मित्र लक्ष्मण खुपसे (रा. नारवट) याच्यासोबत तो दारू पीत बसला. तेथे गणपत आणि लक्ष्मण यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात लक्ष्मणने गणपतचा शर्टाने गळा आवळला. त्यात गणपतचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा -  नांदेड- बुधवारी सर्वात जास्त २३० कोरोना बाधित रुग्णांची नोंद

पोलिसांनी काल पंचनामा केला आहे. गणपतची बहीण नंदाबाई बुरकुले (रा. नारवट) यांनी काल रात्री उशिरा फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. संशयित लक्ष्मणला ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डेडवाल तपास करीत आहेत.

लाकूड तस्करांचा वनरक्षकावर हल्ला
किनवट ः लाकूड तस्करीसाठी अति संवेदनशील आणि कुप्रसिद्ध समजल्या गेलेल्या चिखली बीटमधील हटकर कोरीच्या जंगलात वनक्षक सिद्धार्थ वैद्य यांच्यावर लाकूड तस्करांनी कुऱ्हाडीने हल्ला करून जंगलातून पळ काढला. याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. किनवट वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यकक्षेतील चिखली बीटमध्ये ता.१९ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेच्यादरम्यान वनरक्षक सिद्धार्थ मिलिंद वैद्य हे प्रदीप यादव तामगाडगे व लक्ष्मण नागोराव शिंदे या वनमजुरांसोबत हटकर खोरीच्या जंगलात गस्तीवर होते. लाकूड तस्कर जिवंत सागवान झाडांची तोड करीत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ तस्करांना झाड तोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या तस्करांनी वनरक्षक वैद्य यांच्या अंगावर कुऱ्हाडीचा वार केला; पण तो वार वनरक्षक वैद यांनी आपल्या हातावर घेतल्यामुळे हाताला दुखापत झाली आहे.

संपादन - स्वप्निल गायकवाड

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Argument Over Alcohol Read What Happened Next, Nanded News