

A Zilla Parishad school building in Nanded district that may face closure due to low student strength.
Sakal
-रामेश्वर काकडे
नांदेड: जिल्ह्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सुमारे १५० जिल्हा परिषद शाळांना टाळे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद नांदेडअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाने अशा शाळांची सविस्तर माहिती संकलित करून शासनाकडे अहवाल सादर केला आहे. शासनाच्या धोरणानुसार दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून, संबंधित शिक्षकांचे समायोजन व विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.