esakal | कलावंतांची उपासमार थांबविण्यासाठी कलाकेंद्रे सुरू करावीत 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

अनलॉकमध्ये  चित्रपटगृह, नाट्यगृह तसेच कलाकेंद्रे सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच कलाकेंद्रातील ढोलकीचा ताल व घुंगराजा नाद केव्हा घुमणार याकडे कलाप्रेमींचेही लक्ष लागले आहे.

कलावंतांची उपासमार थांबविण्यासाठी कलाकेंद्रे सुरू करावीत 

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) :  कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी राज्यातील नाट्य, चित्रपटगृह, कलाकेंद्रे  बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा फटका कलावंत, कामगारांसह विविध व्यवसायिकांना बसला आहे. कलाकेंद्रातील घुंगराचा नाद गेल्या सात महिन्यांपासून बंद झाल्याने राज्यातील सुमारे पाच हजार कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने विशेष पॅकेज घोषित करून कलावंतांना आधार द्यावा, अशी मागणी कलावंतांकडून  होत आहे.
  
राज्यातील कलाकेंद्रे गेल्या सात महिण्यापासून लाॅकडाऊन आहेत. याचा मोठा फटका कलाकेंद्रामधील कलावंत, कामगार  व विविध व्यवसायिकांना बसला आहे. या कलाकारांना दुसरे काम करता येत नसल्यामुळे सध्या पदरमोड करून दिवस काढावे लागत आहे. हाताला काम नाही, खायला अन्न नाही,  कलाकेंद्र बंद असे भयावह चित्र बघावयास मिळत आहे.  

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील पंधरा जिल्हा परिषदेच्या शाळा ‘आदर्श’

राज्यात सुमारे ६० ते ७०  कलाकेंद्र असून त्यात विविधप्रकारचे काम करणारे सुमारे पाच हजार कलावंत, कामगार आहेत. यात गायक, वादक, नृत्यांगना, विदुषक, कामगार आदींचा समावेश आहे. ही कलाकेंद्रे गेली सात महिण्यापासून लाॅकडाऊन झाल्याने रोजीरोटीचा खुप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लाॅकडाऊनच्या सुरवातीच्या काळात काही सामाजिक संस्थांनी थोडीफार मदत केली. तसेच केंद्र चालकांनी आपल्या कलावंत, कामगारांना मदत केली. पण आता सात महिण्याचा काळ उलटून गेल्याने जमा रक्कम संपली आहे. अशा परिस्थितीत कलाकारांनी जगावे कसे? अशा संतप्त भावना समोर येवू लागल्या आहेत.  

हे देखील वाचाच - हिंगोली जिल्हा परिषदेने दिली ७८ गुरुजींना समुपदेशनद्वारे पदस्थापना

सध्या अनलॉक आहे. त्यामुळे मॉल, बार, हॉटेल्स, जिम आदी अस्थापणे सुरू झाली आहेत. त्यामुळे कलाकेंद्रेही सुरु करावीत. विशेष म्हणजे लॉकडाउनमुळे प्रभावित झालेल्या घटकांसाठी शासन मदत जाहीर करत आहे. यामध्ये लोककलावंतांचा समावेश नाही. त्यामुळे शासनाने एकतर कलाकेंद्रे सुरु करावीत किंवा आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी कलाकेंद्रचालकासह कलाकार व कामगार करत आहे.  

येथे क्लिक कराच - शेतकऱ्यांच्या शेतीने रोजगाराला तारले, आता मात्र शेतकरीच त्रस्त

लॉकडाउनमुळे राज्यातील कलाकेंद्रातील कलावंत, कामगार यांच्या हाताला काम नसल्याने असंख्य अडचणीला सामोरे जावे लागत आहे. केंद्र चालकांनी होईल तितकी मदत केली आहे. राज्यातील सुमारे पाच हजाराच्यावर कलावंतावर उपासमारीचे वेळ आली आहे. आमच्या मायबाप सरकारने आमच्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे. 
- विद्या काळे, कलाकेंद्र मालक

loading image