नांदेड : आर्टलेरी नाशिक, इएमइ जालंधर, डेक्कन हैदराबाद संघ विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hockey Tournament

नांदेड : आर्टलेरी नाशिक, इएमइ जालंधर, डेक्कन हैदराबाद संघ विजयी

नांदेड : ४८ व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड ॲण्ड सिल्वर कप हॉकी चषक(Sri Guru Gobind Singhji Gold and Silver Cup Hockey Cup) स्पर्धेत गुरुवारी (ता. सहा) कॉर्प्स ऑफ सिंग्नल जलंधर संघावर डेक्कन हैदराबाद संघाचा विजय स्पर्धेत चुरशी निर्माण करून गेला. आज आर्टलेरी नाशिक संघाने नांदेडच्या चार साहबजादा हॉकी क्लब(hockey club) वर पाच विरुद्ध शून्य असा विजय मिळवला. गुरुवारी पहिला सामना एस. एस. अमरावती आणि इलेवन स्टार अमरावतीमध्ये झाला. दोन्ही संघांनी परस्पराविरुद्ध दोन दोन गोल करत सामना अनिर्णीत राखला. एस. एस. अमरावती तर्फे गुफरान शेख याने तर त्याच्या पाठोपाठ नदीम शेख याने मैदानी गोल करत आघाडी मिळवली. पण इलेवन स्टारतर्फे ४९ व्या मिनिटाला निक्की आणि ५१ व्या मिनिटास रिजवान याने गोल करत सामना अनिर्णीत ठरवला.

हेही वाचा: नांदेड : कोरोना चाचणीसह लसीकरणही वाढले

दुसरा सामना आर्टलेरी नाशिक आणि चार साहबजादा हॉकी अकादमी यांचा झाला. नाशिक संघाने संजय टीडूच्या तिसऱ्याच मिनिटाला केलेल्या मैदानी गोलाने आघाडी घेतली. नंतर नाशिक संघाने आक्रमक खेळी करत २० व्या मिनिटास बलकारसिंघ, ३७ मिनिटाला चरणजीतसिंघ, ४२ व्या मिनिटाला पुन्हा बलकारसिंघ आणि ५८ व्या मिनिटाला मनप्रीतसिंघ यांनी गोल केले.

तिसरा सामना इ. एम. इ. जलंधर आणि इटारसी हॉकी क्लब यांच्यात झाला. जलंधर संघाने तीन विरुद्ध एक गोल अंतराने सामना सहज जिंकला. जलंधर संघातर्फे अमनजोत भंभर याने संघाला आघाडी दिली. नंतर १८ व्या मिनिटास मिळालेल्या पेनल्टी कार्नरवर अमित सैनी याने गोल केले. तर गुरजिंदरसिंघ याने ३२ व्या मिनिटाला मैदानी गोल करत सामन्यावर पकड मिळवित विजय प्राप्त केला. चौथा सामना रिपब्लिकन मुंबई आणि भोपाल इलेवन संघात खेळला गेला. मागील दोन्ही सामन्यात भोपाल संघाला मोठ्या गोल फरकाने पराभव सहन करावा लागला होता. भोपाल संघाने २९ मिनिटाला इमाद उद्दीन याने केलेल्या गोलाच्या जोरावर विजय मिळवला. पाचव्या सामन्यात कॉर्प्स ऑफ सिग्नल जलंधर आणि डेक्कन हैदराबाद या संघात सामना रंगला. डेक्कन हैदराबाद संघाने २८ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कार्नरचे रूपांतरण गोलात केले. बी. रामकृष्णा याने गोल केला. ५१ व्या मिनिटाला मिळालेल्या एका पेनल्टी स्ट्रोकमुळे डेक्कन संघाला दुसरा गोल करता आले. मोहमंद अलीम याने गोल केला. जलंधरला पराभव पाचवावा लागला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nandedhockey
loading image
go to top