Ashok Chavan : माहूर मध्ये अशोकराव चव्हाणांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले...

सकल मराठा समाज आक्रमक; या पुढे शुभेच्छा बॅनर झडकणार नाही आंदोलनाचा पवित्रा
ashok chavan birthday banner torn down in Mahur aggressive Maratha community politics
ashok chavan birthday banner torn down in Mahur aggressive Maratha community politicsSakal

नांदेड : जिल्ह्याच्या माहूर शहरात माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांचे वाढदिवसाचे बॅनर सकल मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलकांकडून फाडून निषेध व्यक्त केला आहे.आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याचे वाढदिवस आनंद उत्सव साजरे केले जाणार नाही असा आक्रमक पवित्र आंदोलनकर्त्यांनी घेऊन राष्ट्रीय महामार्गावर स्टेट बँक चौकातील चव्हाण यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले आहे.

राज्यभर सध्या मराठा आरक्षणाची चिंगारी उडाली असून त्याचे लोन माहूर तालुक्यापर्यंत पोहोचले आहे. माहूर तालुक्यातील हडसणी मदनापूर करळगाव सायफळ रुई आदी गावात साखळी उपोषण सुरू आहे.

तर नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे. आशात काँगेस चे जेष्ठ नेते तथा राज्याची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाकडून शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते.हे बॅनर माहूर शहरात राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला भारतीय स्टेट बँक चौकात लावण्यात आले होते.

सकल मराठा समाज बांधवांनी हे शुभेच्छा बॅनर त्या ठिकाणी जाऊन फाडले असून प्रचंड घोषणाबाजी करत नेत्यांविरुद्ध असलेला रोष आंदोलकांनी यातून दाखवून दिला. जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत कुठल्याच नेत्यांचे वाढदिवस आनंद उत्सव साजरा होणार नाही अशी भूमिका आंदोलकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन आता रस्त्यावर उतरले असून येत्या काळात याचे पडसाद यापेक्षा तीव्र उमटेल असे दिसते. मराठा आरक्षण उप समितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण यांना गत आठवड्यात धर्माबाद शहरामध्ये सुद्धा मराठा आंदोलकाच्या रोषाला समोरे जावे लागले होते त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले होते.

तर आज माहूर मध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या शुभेच्छा बॅनर ला आंदोलकांनी लक्ष केले त्यामुळे विद्यमान शिंदे फडवणीस सरकार सह तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर सुद्धा मराठा समाजाचा रोष असून मराठा आरक्षण उप समितीचे अशोक चव्हाण माजी अध्यक्ष असल्याने तर त्यांच्यावर नाराजी ओडवली जात नाही ना अशा चर्चेला सुद्धा पेव फुटले असून काँग्रेसच्या जबाबदार स्थानिक नेत्यांनी मात्र हे बॅनर अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लावले होते असे म्हणून काखा वर केल्या आहेत हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com