Ashok Chavan : राहुल यांचे वक्तव्य तथ्यहीन ; ते विधान माझ्यासंदर्भात असेल तर ते हास्यास्पद आणि अतार्किक

‘‘काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानिमित्त मुंबईत झालेल्या सभेत खासदार राहुल गांधी यांनी काही विधाने करताना कोणाचे नाव घेतलेले नाही. मात्र, ते विधान माझ्यासंदर्भात असेल तर ते हास्यास्पद आणि अतार्किक आहे.
Ashok Chavan
Ashok Chavansakal

नांदेड : ‘‘काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानिमित्त मुंबईत झालेल्या सभेत खासदार राहुल गांधी यांनी काही विधाने करताना कोणाचे नाव घेतलेले नाही. मात्र, ते विधान माझ्यासंदर्भात असेल तर ते हास्यास्पद आणि अतार्किक आहे.

कारण राजीनामा देण्यापूर्वी मी सोनिया गांधी यांना भेटलेलो नाही. त्यामुळे त्यांना भेटून मी काही भावना व्यक्त केल्याचे विधान चुकीचे, दिशाभूल करणारे आणि तथ्यहीन आहे,’’ असे स्पष्टीकरण भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केले.

राहुल गांधी यांची सभा ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर रविवारी (ता. १७) सायंकाळी झाली. ‘काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली. मी त्यांचे नाव घेऊ इच्छित नाही. पण ते रडत माझ्या आईकडे आले होते. आईकडे येऊन म्हणाले, सोनियाजी, या लोकांविरोधात, या शक्तीविरोधात लढण्याची हिंमत माझ्याकडे नाही. मी तुरुंगात जाऊ इच्छित नाही. असे करणारे ते एकमेव नेते नाहीत.

राहुल गांधी यांचा निशाणा अशोक चव्हाण यांच्याकडे होता, अशी चर्चा आहे. त्यामुळे चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘‘राहुल गांधी जे काही बोलले ते माझ्याबद्दल असेल तर ते हास्यास्पद, तर्कहीन आहे. कारण मी सोनिया गांधींना भेटलो नाही. मी पक्ष सोडण्यापूर्वी शेवटपर्यंत काँग्रेसच्या मुख्यालयात काम करत होतो.

Ashok Chavan
Loksabha Election 2024 : निवडणूक आयोगाकडून गृहसचिवांच्या बदल्या

विधानसभेच्या अध्यक्षांकडे माझ्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतरच ही माहिती समोर आली. मी पक्ष सोडेपर्यंत त्याविषयीची माहिती कोणालाही नव्हती, हे वास्तव आहे. त्यामुळे मी अगोदर सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना कळविल्याचे जे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे ते चुकीचे आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com