esakal | शासकीय रुग्णालयाच्या धर्तीवर हैदरबागला सुविधा देण्याची अशोक चव्हाण यांची ग्वाही
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड - हैदरबाग येथे महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण सोमवारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. 

नांदेड वाघाळा महापालिकेच्या देगलुर नाका हैदरबाग येथील महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णवाहिका, एक्स रे व सोनोग्राफी मशीन आदी वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण सोमवारी सायंकाळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

शासकीय रुग्णालयाच्या धर्तीवर हैदरबागला सुविधा देण्याची अशोक चव्हाण यांची ग्वाही

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - शासकीय रुग्णालयात असलेल्या आरोग्य सुविधा नांदेड वाघाळा महापालिकेच्या देगलूर नाका भागातील हैदरबाग येथील रुग्णालयातही उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता. आठ) दिली. 

देगलुर नाका हैदरबाग येथील महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णवाहिका, एक्स रे व सोनोग्राफी मशीन आदी वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण सोमवारी सायंकाळी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री डी. पी. सावंत, काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमर राजुरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपमहापौर मसूद खान, स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सरिता बिरकले, माजी महापौर अब्दुल सत्तार, नगरसेवक शेर अली खान आदींची उपस्थिती होती.

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

आवश्यकतेनुसार आरोग्य सुविधा उपलब्ध करणार 
पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, या भागातील नागरिकांना शासकीय रुग्णालयात जाण्यापेक्षा त्यांना सुविधा हैदरबाग येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रुग्णवाहिका, एक्स रे व सोनोग्राफी मशीन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यानंतरही आवश्यकतेनुसार आणखी अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यामुळे अन्य रुग्णालयात जाण्याचे गरज येथील रुग्णांना भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

नांदेडच्या विकासाची जबाबदारी माझी
आरोग्य, शिक्षण व मुलभुत सोयी सुविधा नांदेडकरांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी विमानसेवा असावी, यासाठी आपला पाठपुरावा सुरु असल्याचे सांगत नांदेडच्या विकासासाठी निधीची कमतरता पडु देणार नाही. आगामी काळात प्रलंबित विकास कामे पुर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. नांदेडकरांनी विकासासाठी आपल्यावर टाकलेला विश्वास असाच कायम ठेवावा, विकासाची जबाबदारी आपली असल्याची ग्वाही श्री. चव्हाण यांनी यावेळी दिली. यावेळी आमदार कल्याणकर, नगरसेवक शेरअली आदींनी विचार मांडले. आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी देगलूर नाका व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

loading image