

Nanded Extortion Case Man Arrested in Mumbai for Threatening Ashok Chavan and Four MLAs While Demanding One Lakh Rupees
esakal
नांदेड : माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील चार आमदारांना एकाच दिवशी उडवून देण्याचा कट रचल्याची बतावणी करून एका व्यापाऱ्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून अटक केली. रखी उर्फ रविंद्र गौतम रोकडे (वय ३९, रा. आष्टा, ता. आष्टी, जि. बीड, ह.मु. सिडको, नांदेड) असे आरोपीचे नाव असून, तो व्यवसायाने दिग्दर्शक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.