esakal | एटीएम कार्डची अदलाबदल करणाऱया टोळीचा सदस्य जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली  माहिती अशी ता. आॅक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान एबीआय एटीएम शिवाजी चौक लोहा येथे आरोपीने फिर्यादीस फसवणुक

एटीएम कार्डची अदलाबदल करणाऱया टोळीचा सदस्य जेरबंद

sakal_logo
By
बा. पू. गायखर

लोहा (जिल्हा नांदेड) : एटीएमची अदलाबदल करून नागरिकास फसविणाऱ्या अंतरराज्य टोळीचा लोहा पोलिसांनी केला पर्दापाश करुन एकास अटक केली आहे. या टोळीतील तिघांवर लोहा पोलिसांत गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी ता. सात आॅक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान एबीआय एटीएम शिवाजी चौक लोहा येथे आरोपीने फिर्यादीस "तुमचे पैसे निघत नाही का मी काढून देतो ",असे  म्हणून त्यांचे एटीएम कार्ड बदलून त्याने स्वतः चे एटीएम कार्ड  देऊन त्यांच्या बँक खात्यातून 33 हजार रुपये काढून फसवणूक केली.

आरोपी सुनील रानबा हाटकर

ज्ञानोबा गोविंदराव घोडके (वय 51 वर्षे) हे शिक्षक राहणार पानभोसी तालुका कंधार  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुनील रानबा हाटकर ( वय 34 ) व्यवसाय बेकार राहणार महाराळगाव ता. कल्याण जिल्हा ठाणे याच्या विरोधात लोहा पोलिसात गुन्हा  दाखल असून पुढील तपास पोलिस निरीक्षक भागवत जायभाये करीत आहेत.

हेही वाचा -  कोरोना व ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची शक्ती दे, श्री रेणुका मातेला साकडे -

नाशिक येथून जेरबंद केले

यानंतर लागलीच पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि  भारती, हवालदार सूर्यवंशी, श्री मुळे व श्री. जाधव यांनी सदरील आरोपीचा शोध घेऊन त्यास नाशिक येथून जेरबंद केले आहे.  त्याच आरोपीने तशाच प्रकारचा गुन्हा शिवाजी चौक लोहा येथील एटीएममध्ये केल्याने त्यावर (  ता. 22)  दुसरा गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे.

चार दिवसाच्या पोलिस कोठडी

सदरील आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. त्याच्या इतर दोन साथिदारांना पकडायचे आहे असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

दोन आरोपी फरार

तसेच त्याचे साथीदार दोन आरोपी फरार आहेत त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच सदरील आरोपीवर लोहा, भोकर , लासलगाव, लातूर, निलंगा,अशा  बर्याच  गावांमध्ये गुन्हे दाखल आहेत. सदरील टोळीचा पर्दापाश पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांनी दिली.

येथे क्लिक करानांदेड : एक तलवार व दोन खंजरसह तिघांना अटक -

फसव्या लोकांपासून सावधान !

 "एटीएमच्या ठिकाणी गर्दी बघून कार घेऊन काही भामटे हे गर्दीचा फायदा घेत नागरिकांना एटीएममधून पैसे काढून देतो म्हणून कार्डाची आदलाबदल करीत आहेत व नंतर पैसे काढून नागरिकांची फसवणूक करीत आहेत आशा भामट्या लोकांपासून  नागरिकांनी सावधान रहावे."

-भागवत जायभाये, पोलिस निरीक्षक, लोहा.

संपादन- प्रल्हाद कांबळे