
नांदेड - कोरोनाचे रुग्ण आता नवीन भागात सापडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर नांदेड शहरात आत्तापर्यंत तब्बल ४८ कंटेन्टमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, कंटेन्टमेंट झोन जाहीर करताना त्यात अडचणी असून नागरिकांमध्येही संभ्रमावस्था आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला त्यात अधिक बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे.
कोरोना आणि लॉकडाउन ता. २४ मार्चपासून सुरु झाल्यानंतर ता. २१ एप्रिलपर्यंत म्हणजेच जवळपास एक महिना कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. पहिला रुग्ण २२ एप्रिलला आढळून आला. त्यानंतर शहरातील इतर भागात रुग्ण आढळून येत राहिले. त्याचबरोबर ग्रामिण भागातही रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली.
हेही वाचा - खरीप पेरणीला झाली सुरवात.....कुठे ते वाचा
५५ दिवसात २८० रुग्ण
नांदेड शहर आणि जिल्ह्यात ता. २२ एप्रिल ते ता. १६ जून सकाळपर्यंत या एकूण ५५ दिवसात २८० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पहिला रुग्ण पिरबुऱ्हाणनगर येथे आढळून आला होता. आत्तापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १३ आहे. त्यापैकी तीन बाहेरील जिल्ह्यातील आहेत. उपचार घेऊन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १७७ असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ९० आहे.
कंन्टेनमेंट झोन ठरवताना दुर्लक्ष नको
एका बॅंकेतील कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. बॅंकेतील काही कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे सोमवारी (ता. १५) एकाच दिवशी तब्बल १६ कंन्टेनमेंट झोन जाहीर करण्याची वेळ आली. आत्तापर्यंत ४८ कंन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, हे झोन जाहीर करत असताना काही ठिकाणी चुका होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दीपनगरला एकजण आढळून आल्यानंतर त्या ठिकाणी कंन्टेनमेंट झोन अजूनही जाहीर झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेने कंन्टेनमेंट झोन जाहीर करताना दक्ष राहणे आवश्यक आहे. नाहीतर पुन्हा नागरिकांच्या मध्ये भीतीची भावना निर्माण होऊ शकते.
हेही वाचलेच पाहिजे - सोशल माध्यमावर बदनामी करतोस काय ? म्हणून... -
कंन्टेनमेंट झोन औपचारिकता ठरू नये
कंन्टेनमेंट झोन जाहीर झाल्यानंतर त्या परिसरात नियम व अटी कडक असतात. त्यातील निर्बंध काटेकोरपणे पाळावे लागतात. या परिसरात महापालिकेने अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित आहे. परंतू कंन्टेनमेंट झोनमध्ये असे होताना दिसून येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कंन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात येतो. मात्र, त्याचे पालन नागरिक करत नसतील तर कंन्टेनमेंट झोन ही एक औपचारिकता ठरेल. त्यामुळे त्याकडे जिल्हा व महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.