नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार जाहीर 

प्रमोद चौधरी
Friday, 4 September 2020

नांदेड जिल्ह्यात यंदा १६ प्राथमिक, ११ माध्यमिक आणि एक विशेष शिक्षक अशा एकूण २८ जणांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. 

नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्काराची घोषणा गुरुवारी करण्यात आली आहे. यंदा १६ प्राथमिक, ११ माध्यमिक आणि एका विशेष शिक्षक अशा एकूण २८ जणांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन राज्य तसेच केंद्र शासनाच्या निर्देशाचे पालन करीत पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख ठरविण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिली.  

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने वर्षभर शिक्षकांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक व्हावे, इतरांनाही प्रेरणा मिळावा, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा दर्जा उंचावा यासाठी हा पुरस्कार देवून उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव करण्यात येतो. शनिवारी (ता.पाच) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट शैक्षणिक काम करणाऱ्या एकूण २८ शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.

हेही वाचा -  वेशीमधला वाद थेट पोहचला पोलिस ठाण्यात, काय आहे कारण?

प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी एक प्राथमिक व एक माध्यमिक व एक विशेष शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. आलेल्या प्रस्तावातून त्यातून उत्कृष्ट शिक्षकांची निवड समितीद्वारे निवड केली जाते. निवड समितीने निवड केलेल्या यादीला नुकतीच विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे. मात्र, दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त होणाऱ्या या पुरस्कारांचे वितरण यंदा कोरोनामुळे करता येणार नाही. त्यामुळे आता हे पुरस्कार आॅफलाईन कि आॅनलाईन दिले जाणार, याकडे पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे लक्ष लागून आहे. 

हे देखील वाचाच - नांदेडात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात ४४३ पॉझिटिव्ह; आठ जणांचा मृत्यू

प्राथमिक शिक्षकांमध्ये 
विकास दिग्रसकर (विष्णुपुरी), केशव दादजवार (केंद्रिय प्राथमिक शाळा, पिंपळगाव), पद्माकर कुलकर्णी (जि.प.हायस्कूल, माळकौठा), सदाशिव हात्ते (काटकळंबा), रमेश पवार (बोरगाव), भागवत पाटील (बेरळी खु.), गणेश कदम (टाकळी वडग), मन्मथकृष्ण नायटे (गागलेगाव), नागोराव चिंतावार (धानोरा), सायबलू भुमन्ना (बाळापूर), प्रणिता देशमुख (दिवशी खु.), शंकर बेळकोणे (मंडाळा), प्रवीण नरवाडे (बाभळी), पांडुरंग कोकुलवार (एकंबा), शांताराम जायभाये (विठ्ठलवाडी), मोहन जाधव (गुंडवळ) यांचा समावेश आहे.

येथे क्लिक करा - केळी बागायतदारांनो सावधान ! विषाणू रोग आणि फुलकिडीचे होतेय आक्रमण

माध्यमिक विभागातून
राजाराम कऱ्हाळे (अर्धापूर), पितांबर मिस्त्री (मुखेड), पुरभा बांगाने (माळकौठा), डाॅ. बरकत उल्ला खाजा नजीमोद्दीन (शहापूर), शिवाजी कोंडावार (लोहगाव), शंकर इंगळे (घुंगराळा), गौसीया नासेर वडजकर (येताळा), राजकुमार पांडुरंग बेरळीकर (पाळज), शेख इरफान अहमद (हदगाव), मोहन गोबरा जाधव (किनवट) असा ११ शिक्षकांचा समावेश असून बारड येथील बाबू रामजी कुलूपवाड यांना विशेष शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - Video-धक्कादायक : हिंगोलीत बनावट नोटांचा कारखाना, पोलिसांचा छापा, लाखोंचा मुद्देमाल जप्त

सध्या कोविड १९ ची परिस्थिती गंभीर असल्याने परिस्थिती निवळल्यानंतर व शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या निर्देशानुसार जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरणाची तारीख जाहीर करून सन्मानपूर्वक पुरस्कार वितरित करण्यात येतील.
- मंगाराणी अंबुलगेकर, अध्यक्षा जिल्हा परिषद नांदेड, 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awards Announced For Teachers In Nanded District