esakal | नांदेडात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात ४४३ पॉझिटिव्ह; आठ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकुण संख्या सात हजार ८५० वर पोहचली आहे. आठ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने एकुण मृत्यूसंख्या २५१ इतकी झाली आहे. दहा दिवसाच्या उपचारानंतर बुधवारी २२४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

नांदेडात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात ४४३ पॉझिटिव्ह; आठ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - नांदेडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढतच चालले असून गुरुवारी (ता. तीन) आलेल्या अहवालात तब्बल ४४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे २४ तासात आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात २२४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दररोज वाढत असलेल्या रुग्णांचा आकडा हा प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचा विशय ठरत आहे. 

आरटीपीसीआर चाचणीनुसार १२८ आणि अँन्टीजन टेस्ट किटच्या माध्यमातून ३१५ असे एकुण ४४३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकुण संख्या सात हजार ८५० वर पोहचली आहे. आठ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने एकुण मृत्यूसंख्या २५१ इतकी झाली आहे. दहा दिवसाच्या उपचारानंतर बुधवारी २२४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत पाच हजार एक रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. 

हेही वाचा- नांदेड-  महावितरण कंपनीच्या बदनामी मागे कुणाचा हात, विज ग्राहकावर दुहेरी संकट, कसे? ते वाचाच​

आठ बाधित रुग्णांचा मृत्यू 

गुरूवारी मृत्यू झालेल्यांमध्ये जुना मोंढा नांदेड पुरुष (वय ७५), वेलमपूरा किनवट महिला (वय ७०), आक्सा कॉलनी नांदेड पुरुष (वय ४५), गोकुळनगर नांदेड पुरुष (वय ७५), बोधडी किनवट महिला (वय ४७), लोहा पुरुष (वय ७०), बोरबन परिसर नांदेड पुरुष (वय ८१), औराळा (ता. कंधार) पुरुष (वय ५२) या आठ बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

दिवसभरात नांदेड महापालिका क्षेत्रात २३८, नांदेड ग्रामीणमध्ये २४, किनवटला १४, भोकरला पाच, लोह्यात ३७, नायगावला पाच, कंधारला दहा, माहूरला दहा, अर्धापूरला दहा, मुखेडला १८, देगलूरला तीन, धर्माबादला आठ, हिमायतनगरला एक, हदगावला १४, मुदखेडला १३, बिलोलीत १२, उमरीत चार, यवतमाळचे दोन, मुंबईचा एक, हिंगोलीचे सात, लातूरचा एक, परभणीचे सहा असे एकुण ४४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

हेही वाचा- नांदेड : परभणीतून फरार झालेल्या कैद्याला भोकर पोलिसांकडून अटक

२४६ रुग्णांची प्रकृती गंभीर 

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातील दोन, पंजाब भवन कोविड सेंटरमधील १३३, अर्धापूरचे नऊ, मुखेडचे २८, हदगावचे दहा, लोह्यातील सात, देगलूरला सहा, भोकरला सहा, किनवटमध्ये सहा, मुदखेडला तीन, बिलोलीत तीन व खासगी रुग्णालयातील ११ असे २२४ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या विविध रुग्णालयात दोन हजार ५४४ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून त्यापैकी २४६ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.

नांदेड कोरोना मीटर 

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ः सात हजार ८५० 
गुरुवारी पॉझिटिव्ह ः ४४३ 
गुरुवारी मृत्यू ः आठ 
एकुण मृत्यूसंख्या ः २५१ 
गुरुवारी सुटी दिलेले रुग्ण ः २२४ 
एकूण रुग्णालयातून सुटी दिलेले ः पाच हजार एक 
गंभीर रुग्णांची संख्या ः २४६