जी. आर. चिंतालामुळे कृषी व ग्रामिण विकासाला बळकटी मिळेल......कशी ते वाचा

NND29KJP01.jpg
NND29KJP01.jpg

नांदेड : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामिण विकास बॅंकेच्या (नाबार्ड) अध्यक्षपदी केंद्र शासनाने जी. आर. चिंताला यांची नियुक्ती केली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी ता. २७ मे रोजी नाबार्डच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. नाबार्डचे अध्यक्ष होण्याआधी श्री चिंताला बेंगलुरु येथील ‘नैबफिन्स’ चे व्यवस्थापकीय  संचालक होते, अशी माहिती नाबार्डच्या नांदेड जिल्हा विकास कार्यालयातून मिळाली. त्यांच्या काळात ग्रामिण व कृषी विकासाला चालणा मिळेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नाबार्डमध्ये विविध पदावर काम 
श्री चिंताला भारतीय कृषि अनुसंधान संस्थान, नवी दिल्लीचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. नाबार्डमध्ये अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी नाबार्डच्या मुंबई मुख्य कार्यालयात आणि हैदराबाद, लखनऊ, चंडीगड, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, नवी दिल्ली आणि बेंगलुरु येथील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विविध पदांवर कार्य केले आहे. श्री चिंताला ऍग्री बिजनस फायनांस लि. हैदराबादचे दोन वर्ष उपाध्यक्ष होते. आणि बॅंकर ग्रामीण विकास संस्थान (बर्ड), लखनऊचे निदेशक होते. श्री चिंताला यांनी विविध सल्लागार समनुपदेशन संबंधित कार्य देखील केले आहे. 

अंदमान आणि निकोबारमध्ये केले काम
‘स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना (एसजीएसवाई) मध्ये अनुसूचित जाति - जमातींच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभावोत्पादकता’ हा विषय प्रमुख होता. यांच्या शिफारशींमुळे संपूर्ण देशात  एसजीएसवाईच्या जागी राष्ट्रीय ग्रामीण आजीविकामिशन (एनआरएलएम) सुरू करण्यासाठी मदत झाली. श्री चिंताला यांनी नाबार्ड मधील त्यांच्या सेवेच्या दरम्यान अंदमान आणि निकोबार द्वीप समूहातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या खोबरे (नारळ) उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी योग्य व लाभदायक दर निश्चित करण्यासाठी तिथे शेतकरी उत्पादक संघटनेचा शुभारंभ केला.  

वीस पेक्षा अधिक देशात शोध निबंध सादर 
श्री चिंताला यांनी वीस पेक्षा अधिक देशात ज्यामध्ये बोलिविया, ब्राज़ील, केन्या, सेनेगल, इंडोनेशिया आणि संयुक्त राज्य अमेरिका, चीन, यूरोपियन देश प्रामुख्याने आहेत, आपले शोध निबंध सादर केले आहेत. समनुपदेशनाचे कार्य करण्यासाठी प्रवास केला आहे. श्री चिंताला यांनी विभिन्न क्षेत्रात केलेले कार्य व त्यांच्या  समृद्ध अनुभवाचा नाबार्डला कृषि आणि ग्रामीण विकासाच्या संदर्भात अधिक फायदा होईल, विशेषकरून वर्तमान कोविड - १९ महामारीच्या आव्हानाच्या काळात त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईलअनुभवाचा उपयोग होईल, अशी माहिती नांदेडच्या जिल्हा विकास कार्यालयातून मिळाली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com