
Bacchu Kadu
sakal
हदगाव : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता. परंतु, सत्ता मिळताच हा शब्द सरकारने पाळला नाही. याची आठवण करून देण्यासाठी जून महिन्यात महायुती सरकारविरोधात मोठे आंदोलन उभे करण्यात आले होते. त्या आंदोलनाला हदगावातील शेतकरी नेते आत्माराम जाधव वाटेगावकर यांनी अन्नत्याग उपोषण करत पाठिंबा दिला होता.