Agricultural Loss: गोदावरी नदीच्या बॅकवॉटरने उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय केली असून हजारो हेक्टर शेती जलमय झाली आहे. शेतकऱ्यांचे लाखोंच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
उमरी : गोदावरी नदीच्या बॅकवॉटरने उमरी तालुक्यातील गंगापट्टी परिसरात भीषण कहर केला असून, बोळसा, बाळेगाव, इज्जतगाव, मनूर, रहाटी, भायगाव, ईळेगाव, हंगरगा आदी गावांतील हजारो हेक्टर शेती पूर्णपणे जलमय झाली आहे.