शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’

‘साईप्रसाद’ परिवाराची शेतकऱ्यांना आर्त हाक : चारच दिवसात केली एक लाखाची मदत
farmer suicide
farmer suicidesakal
Updated on

नांदेड : रंजल्या गांजलेल्यांना उभारी देणाऱ्या साईप्रसाद परिवाराने आता जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’ सुरु केले आहे. जिल्ह्यातील कोरडवाहू (दोन एक्कर पेक्षा कमी) शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच या अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार आहे.(farmer suicide)

farmer suicide
अखिलेश यादव यांना व्हर्च्युअल रॅली पडली महाग

‘आभाळाची विशाल दानत, येईल शिवार पुन्हा भरात, साईप्रसाद तुझा सोबती, देत राहील मदतीचा हात’ या स्लोगननुसार दहा वर्षाच्या निःस्वार्थ सेवेनंतर साईप्रसाद परिवाराने शेतकऱ्यांना बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून आर्त हाक दिली आहे. हे अभियान सुरु करून चारच दिवस झाले असून, या चार दिवसात रेणापूर (ता.भोकर) येथील तुकाराम बोईनवाड यांना ६० हजार तसेच आलेगाव (ता.नांदेड) येथील परमानंद गिरी यांना ५० हजार रुपये अशा दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.

farmer suicide
नाशिक : तिसऱ्या लाटेसाठी ‘बिटको रुग्णालय' सज्ज

सद्यस्थितीत शेतकरी या ना त्या कारणाने वैफल्यग्रस्त झाला आहे. काहींनीतर आत्महत्येला जवळ केले आहे. काहींच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ लागला आहे. अशा शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे म्हणून हे अभियान सुरु केले आहे. मुलामुलींचे लग्न, नापिकी, आजारपण अशा प्रकारच्या कारणांनी वैफल्यग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी साईप्रसादच्या सदस्यांकडे संपर्क साधून आपली संपूर्ण माहिती द्यावी. गरज ओळखून त्यांना तत्काळ साईप्रसाद परिवारातील दाते मदत करतील.

दहा हजार कुटुंबाचा परिवार

साईप्रसाद परिवाराची स्थापना ११ जुलै २०१२ रोजी झाली. मागील दहा वर्षात समाजातील गरजवंत, दिव्यांग आदींसाठी आवश्यक असणारी मदत परिवारातील दात्यांकडून करण्यात येत आहे. साईप्रसाद परिवार नोंदणीकृत संस्था नाही. भाषण, सत्कार, प्रसिद्धी, बैठका या सर्व गोष्टी बाजूला ठेवून दहा वर्षांपासून अखंडीत सेवा सुरु आहे. साईप्रसाद परिवारात भारतासह विदेशातील भारतीय मिळून दहा हजार कुटुंब असून, निःस्वार्थपणे मदत करत आहेत.

farmer suicide
तामिळनाडूत पूर्ण लॉकडाऊन, चेन्नईच्या रस्त्यावर कोणी दिसेना

शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका

बॅंकेचे कर्ज फिटत नाही. व्याज वाढत आहे. उत्पन्न काहीच नाही. त्यामुळे खायचे काय, जगायचे कसे, असे विचार मनात येत असलेतरी शेतकऱ्यांनो, आत्महत्येचे पाऊल उचलू नका...साईप्रसाद परिवाराशी संपर्क साधा. निश्चितच तुम्हाला मदत केली जाईल. आत्महत्या करून मुले, पत्नी, वृद्ध आई-वडिलांना वाऱ्यावर सोडू नका.

- साईप्रसाद परिवार, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nanded
Turning Grief into Determination: Abhimanyu Cracks MPSC Revenue Assistant Exam
Police Raid Grocery Store, Trace Larger Gutkha Stock Worth Lakhs in Nanded City
Mother’s hard work and son's determination lead to PSI success
Marathi News Esakal
www.esakal.com