esakal | केळी उत्पादकांची लूट, बंदी असताना द्यावी लागतेय आडत
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

कधी वादळी वारे, तर कधी गारपीट या निसर्गाचा सामना करत शेतकरी मोठ्या हिम्मतीने आपल्या शेतात मिळेल त्या पिकातून उत्पन्न काढतो. मात्र या वर्षी लॉकडाउन असल्याने केळी उत्पादकांना चांगलाच फटका बसला आहे.

केळी उत्पादकांची लूट, बंदी असताना द्यावी लागतेय आडत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अगोदरच दुष्काळाच्या सावटाखाली आहे. लहरी निसर्ग ऐन केळी काढणीच्या वेळी आपले अंग दाखवितो. कधी वादळी वारे, तर कधी गारपीट या निसर्गाचा सामना करत शेतकरी मोठ्या हिम्मतीने आपल्या शेतात मिळेल त्या पिकातून उत्पन्न काढतो. मात्र या वर्षी लॉकडाउन असल्याने केळी उत्पादकांना चांगलाच फटका बसला आहे. बंदी असतांना प्रतिक्विंटल साठ रुपये आडत द्यावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी लुट होत असल्याचे दिसून येत आहे. 

सध्या केळीला पाचशे रुपये भाव आहे. प्रतिक्विंटल ६० रुपये आडत, १२ किलो दंडापत्तीचे ६० रुपये असे मिळून १२० रुपये कपात केली जात आहे. तसेच मोजणीच्या वेळेस एक किलो ८०० ग्रॅम वजन झाल्यावर एक किलोच वजन धरण्यात येते. वरील ८०० ग्रॅमचे वजनच घेतले जात नाही. यामुळे ८०० ग्रॅमचे नुकसान होते. तर एक गाडी (ट्रक) १८ टनाची झाल्यावर दंडापत्तीच्या नावाखाली २१ क्विंटल ६० किलो कपात केली जाते. गाडीमागे दहा हजार ८०० रुपयाची कपात होते. तर लोडिंगच्या नावाखाली दहा हजार ८०० असे गाडीला एकवीस हजार ६०० रुपये कपात करण्यात येते. हा सर्व व्यवहार कच्च्या पावतीवर केला जातो. आडत कपातीची कुठेही नोंद घेतली जात नाही.

हेही वाचा - दलितवस्ती नियोजनाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

कट्टीच्या नावाखाली बारा किलो वजन कपात

राज्य सरकारकडून आडतबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात मात्र, आडत आकारून केळी उत्पादकांची लूट होत आहे. प्रति क्विंटलला साठ रुपये आडत भरावी लागत आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे केळीच्या भावात प्रचंड घसरण असताना दुसरीकडे प्रतिक्विंटल साठ रुपये आडत आकारणी व प्रति शंभर किलो वजनाला कट्टीच्या नावाखाली बारा किलो वजन कपात केले जात आहे.  यावर प्रशासनाकडून मात्र कुठलाही अंकुश नसल्याचे दिसत आहे. लॉकडाऊन असल्याचे कारण दाखवून केळीच्या भावातही प्रचंड घसरण झाली आहे. केवळ चारशे ते पाचशे रुपये दरच केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. 

प्रतिक्विंटल सरासरी १२० रुपये फटका

लागवडीसाठी खूप मोठा खर्च करूनही आताच्या परिस्थितीत तो खर्च निघणेही अवघड होऊन बसले आहे. आडत व दंडापत्तीच्या नावाखाली प्रतिक्विंटल सरासरी १२० रुपये फटका बसत आहे. केळीच्या बाजारावर कुणाचेच नियंत्रण नाही. नांदेड जिल्ह्यातील केळीच्या बाजारावर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट होत आहे. विशेष म्हणजे, केळीच्या बाजारातील सर्व आर्थिक व्यवहार कच्च्या पावतीवर केला जातो. या पावत्यांवर कशाचाही उल्लेख नसतो. टाळेबंदीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका. 

येथे क्लिक करासोयाबीनच्या अधीक उत्पादनासाठी ‘अशी’ करा पेरणी

जिल्हातील अर्धापूर, नांदेड, मुदखेड, हदगाव केळी उत्पादन

जिल्ह्यात वरील तालुक्यात केळीची लागवड केली जाते. केळीला लागवड खर्च खूप मोठा येतो. यंदाच्या हंगामात धरणाचे पाणी उपलब्ध झाल्याने केळीचे क्षेत्र वाढले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली. केळी हे नाशवंत पीक असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून मनमानेल त्या भावात केळीची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. 

आडत बंदीची जिल्ह्यात अंमलबजावणी नाही

एकीकडे भावात होणारी घसरण तर दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून होणारी लूट अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. राज्य शासनाने आडतबंदीचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी नांदेड जिल्हयात केली जात नाही. केळीला प्रतिक्विंटल साठ रुपये कपात केली जाते. अशी कपात महाराष्ट्रात कुठेच केली जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. तर केळीचे घड काढते वेळेस दंड कापला जात असताना व्यापारी प्रतिक्विंटल बारा किलो दंडापत्ती कपात करतो. अशी होतेय केळी उत्पादक शेतकऱ्याची लूटसध्या केळीला पाचशे रुपये भाव आहे. 

शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

केळी उत्पादकांची होणारी लूट थांबविण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. यासंबंधी लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती शेतक-यांनी दिली. साठ रुपये व्यापाऱ्यांकडून घ्यावेत - मानेजी उर्फ बारकु पाटील कोकाटे, सांगवी, नांदेड
 

loading image
go to top