बँक अधिकाऱ्याची शेतकऱ्यांप्रती तळमळ : एका महिन्यात ८८० जणांना पिक कर्ज वाटप

प्रल्हाद हिवराळे
Thursday, 24 September 2020

बॅंक व्यवस्थापकाचे काम पाहुन उद्योजक मारोतराव कवळे यांनी केला त्यांचा बँकेत जाऊन सन्मान 

उमरी (जिल्हा नांदेड) : उमरी शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत नव्यानेच व्यवस्थापक प्रविण राठोड एक महिन्यापूर्वी रुजू झाले. या काळात कर्ज माफीसाठी आलेले पात्र ६६० शेतकऱ्यांपैकी ५८० शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा झाले. बाकी ८० शेतकऱ्यांचे शिल्लक राहिलेले कर्ज माफिचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नसुन त्यात  त्रुटी आल्या आहेत. आधार प्रमाणीकरण झाले नाही व काही खातेदार मयत झाल्यामुळे कर्ज माफीचे पैसे जमा झाले नाहीत.

यामध्ये ५५० खातेदारांना नंतर नवीन कर्जही वाटप करण्यात आले. आतापर्यंत महाराष्ट्र ग्रामीण बॅंक पिक कर्ज तीन कोटी ३० लाख रुपये शेतक-यांना वाटप करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बॅंक ही पिक कर्जासाठी शेतक-यांना एक वरदान  ठरली आहे. बॅंकेअंतर्गत १७ गावांना पिक कर्ज वाटप जोरात असुन अजुनही जुने खातेदार सोडुन ३०० नविन शेतकरी खातेदारांनी त्यांचे प्रस्ताव पिक कर्जासाठी फाईल सादर केल्या आहेत. त्यांचेही काम प्रगतीपथावर असुन पुर्ण कागदपञे जमा झाले की त्यांनाही पिक कर्ज देण्यात येईल असे महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे व्यवस्थापक प्रविण राठोड यांनी सांगितले. 

हेही वाचा  बापरे, सततच्या पावसाने विहीर २० फुटापर्यंत खचली

यांची होती उपस्थिती

बॅंकेचे व्यवस्थापक प्रविण राठोड यांनी पिक कर्जाचे काम मोठ्या गतीने नि: क्षपातीपणाने करीत असल्याने उद्योजक मारोतराव कवळे यांनी ता. २२ सप्टेंबर रोजी बॅंकेत जाऊन प्रविण राठोड यांचा सत्कार केला. वेळी शेतकरी आनंदराव पाटील भायेगावकर, माधवराव पाटील बोळसेकर, श्री. नगुलकर, प्रल्हाद हिवराळे, शिवाजी मामा, राम पंदिलवाड, आनंद पाटील  आदी उपस्थित होते. 

 ५५० शेतक-यांना ३ कोटी ३० लाख रुपये वाटप

विशेष म्हणजे प्रविण राठोड यांनी या बॅंकेत कोणताच दलाल ठेवला नसुन सरळ शेतकरी या बॅंक व्यवस्थापक यांना भेटले की पिक कर्जाचे काम तात्काळ करीत असल्याने शेतकरी वर्गही समाधान व्यक्त करीत आहेत. यामध्ये ज्या शेतक-यांचे इतर बॅंकेचे कर्ज नसले की त्यांना तात्काळ कर्ज देण्यात येत आहे. मागील एक हजार ४३१ पिक कर्जाच्या फाईली होत्या. त्यापैकी ६६० शेतक-यांचे महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत कर्ज माफ झाले. त्यापैकी ५५० शेतक-यांना ३ कोटी ३० लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले.  

हे आहेत तालुक्यातील गावे

महाराष्ट्र ग्रामीण बॅंक अंतर्गत सतरा गावे असुन यामध्ये अस्वलदरी, बोळसा ग.प., ढोलउमरी, दुर्गानगर, फुलसिंगनगर, हुंडा ग.प., जामगाव, कळगाव, करकाळा, कारला, पळसगाव, सावरगाव दक्षिण, शेलगाव, शिवनगाव, सिंधी, वसंतनगर, इश्वरनगर आदी गावातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचे काम सुरू केले. यात मुदखेड तालुक्यातील वाई, कोल्हा आदी गावातीलही शेतक-यांना पिककर्जे वाटप करण्यात आले. 

येथे क्लिक करा व्हिडीओ ; येलदरीच्या दहा, सिध्देश्वरच्या आठ तर दुधनाच्या बारा दरवाजातून मोठा विसर्ग 

दलालविरहीत काम

प्रत्यक्ष शेतक-यांनी बॅंकेत येऊन माझ्याकडे पिककर्जासाठी अर्ज केला असेल तो मंजूर करून पिककर्ज तात्काळ देऊन टाकत आहे. येथे दलालामार्फत कोणतेही कामे होत नाही. यामागचे उद्देश आहे की शेतक-यांच्या भोळ्या पणाचा फायदा घेऊन जे काही दलाल काम करतात ते आतापर्यंत येथे झाले नाही, पुढे होणार नाही यांची दक्षता घेतली जाणार आहे.
- प्रविण राठोड, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक व्यवस्थापक, उमरी.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank official's longing for farmers: Crop loans distributed to 880 people in a month nanded news