esakal | धक्कादायक : बारडच्या कोविड केंद्रातून बाधित रुग्ण पळाला, गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

कोरोना रुग्णांची काळजी घेण्यात आरोग्य विभाग कमी पडत असल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील बारड येथे सोमवारी उघडकीस आली आहे.

धक्कादायक : बारडच्या कोविड केंद्रातून बाधित रुग्ण पळाला, गुन्हा दाखल

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने काठीण्य पातळीवर प्रयत्न केले जात आहे. असे असतानाही कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु असताना बाधित रुग्ण पळाल्याने आरोग्य विभागाची एकच धावपळ झाली.

ग्रामीण रुग्णालय बारड (ता.मुदखेड) येथे कोवीड सेंटरमध्ये अनेक बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी एक रुग्ण सोमवारी (ता.१४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास कुणालाही न सांगता पळून गेला. विशेष म्हणजे कोरोनाचा मानवी जिवीतास धोका असतानाही आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा यामुळे चव्हाट्यावर आला आहे. कोविड सेंटरमधील ब्रदर विलास शामराव वाघमारे याने बारड पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून, बारड पोलिस ठाण्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेड काॅन्स्टेबल श्री. कारंजकर पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरूपी समायोजन रखडले​

जिल्ह्यात तीन दुचाकीच्या घटना
नांदेड ः
खानापूर (ता.देगलूर) येथील बालाजी हानमंतराव घरडे यांनी आपल्या घरासमोर उभी केलेली दुचाकी (क्र. एमएच-२६/ एएन-५९२३) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. गाडीची किंमत २० हजार रुपये असून, बालाजी घरडे यांच्या तक्रारीनुसार देगलूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुसरी घटना माळाकोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. घुगेवाडी (ता.लोहा) येथील दिनकर वैजनाथ नागरगोजे यांची टीव्हीएस विक्टर कंपनीची दुचाकी (एमएच-२६/ बीजी ४९०६) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. गाडीच्या डिक्कीमध्ये विवो कंपनीचा मोबाईल होता. दोन्हींची मिळून एकूण ५५ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दिनकर नागरगोजे यांनी माळाकोळी पोलिस ठाण्यामध्ये दिल्याने, गुन्हा नोंदविण्यात आला. 

हे देखील वाचा - Video - नांदेडमध्ये सोमवारी रात्री पावसाची जोरदार बॅटींग, बहुतांश रस्ते झाले होते जलमय

तसेच विष्णुपुरी येथील दत्त मंदिराजवळील घरासमोरून हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची दुचाकी (एमएच-२६/ बीएच ६९८२) चोरीला गेली आहे. दुचाकीची किंमत ६० हजार रुपये इतकी होती. विलास तातेराव भोसले यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही बघाच - धक्कादायक! भाजप खासदाराला एकाच महिन्यात दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण ​

मुखेडमध्ये विवाहिता छळाच्या दोन घटना
नांदेड ः
व्यंकटेशनगर मुखेड येथे २७ वर्षीय महिलेचा सासरकडील मंडळींनी संगनमत करून छळ केला. माहेरी जावून सेतु केंद्र, फर्टीलायझर दुकान टाकण्यासाठी पाच लाख रुपये घेवून ये, तसेच कोर्टात टाकलेली केस मागे घे असे म्हणून मारहाण, शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केला. शिवाय तु फारकत नाही दिल्यास जिवे मारण्याचीही धमकी दिली, अशी तक्रार सदर विवाहितेने मुखेड पोलिस ठाण्यामध्ये दिली असून, सासरकडील मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

येथे क्लिक कराच - नांदेडला हरभरा उत्पादकांचे ४० कोटींचे चुकारे थकले...

दुसरी घटना व्यंकटेशनगर मुखेड येथील २२ वर्षीय विवाहितेच्या बाबतीत घडली आहे. या विवाहितेलाली माहेरहून  चार लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरकडील मंडळींनी विविध कारणे दाखवून सातत्याने छळ केला. जिवे मारण्याचीही धमकी दिली, अशी तक्रार सदर महिलेने मुखेड पोलिस ठाण्यात दिल्यानुसार सासरकडील मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

loading image