बारडचे सरपंचपद अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव

ladies.jpg
ladies.jpg


बारड, (ता. मुदखेड, जि. नांदेड) ः सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव सुटले असून सिंहासनाचा मानकरी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आश्वासन वचनपूर्तीची प्रतीक्षा ग्रामस्थांना लागली आहे. 
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या विकास कामांना केंद्रस्थानी मानत दोन्ही परस्परविरोधी पॅनेलने निवडणूक लढविली होती. त्यामुळे सुरवातीपासूनच शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. 


राहूल आठवले एकमेव विजयी 
गावच्या सत्तेच्या सिंहासनाचा मानकरी कोण याची केवळ औपचारिकता उरली असली तरी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सरपंचपद सुरवातीच्या अडीच वर्षासाठी बौद्ध समाजाच्या उमेदवारांना संधी मिळणार असे आश्वासन मिळाल्यामुळे वचनपूर्तीची निश्चितच प्रतीक्षा आहे असे दिसले. अग्निपरीक्षा असल्याचे सुर ऐकावयास मिळत आहे. उमेदवार निश्चित केले असे पहावयास मिळाले. अनुसूचित जाती सरपंच पदासाठी तीन पर्याय असले तरी त्यामध्ये दोन महिला व एक पुरुष असे आरक्षण सोडण्यात आले होते. बौद्ध समाजाला उमेदवारी देण्यात आली होती. 

राहूल आठवले एकमेव विजयी 
ग्रामपंचायतच्या निवडणुकीत दावेदार निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले होते. प्रभाग क्रमांक चारमधून मारुती कांबळे यांनी राखीव जागेवरून निवडणूक लढविली परंतु या जागेवर विरोधी गटाचे राहूल आठवले एकमेव विजयी झाले असल्याने सरपंच पदाचे स्वप्न मात्र भंगले आहे. सरपंच पदाचे दावेदार म्हणून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून सोनी मोहन सूर्याला तसेच मंगला शिवाजी बुरडे या विजयी झाल्या आहेत. 

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा 
प्रभाग क्रमांक सहा मधून सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून बौद्ध समाजाचे प्रभाकर आठवले विजयी झाले असून संजय देशमुख यांचे ते निकटवर्ती समजले जाते. यामुळे आता पुन्हा एकदा सत्तेची सूत्र संजय देशमुख यांच्या हातात येणार असे ऐकावयास मिळत आहे. सरपंच उपसरपंच निवड इकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गावच्या सिंहासनाचा मानकरी कोण याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून राजकीय समीकरणे कशी जुळवणारा याची मात्र राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com