Nanded Accident: भरधाव कारची ऑटोला समोरून धडक; एक ठार, तीन जण गंभीर
Auto Car Accident: बरडशेवाळा फाटा परिसरात ऑटोला भरधाव कारची झालेली धडक भीषण ठरली असून एका व्यक्तीचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले. हदगाव–वांरगा राष्ट्रीय महामार्गावरील या अपघातामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बरडशेवाळा : चिंचगव्हाण (ता. हदगाव) येथील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंत्यविधीनंतर परतणाऱ्या ऑटोला भरधाव कारने जोराची धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार, तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.