esakal | काळजी घ्या ! महामारीत सर्वात जास्त त्रास मलाच; आपल्या फुफ्फुसाचे भावनिक मनोगत

बोलून बातमी शोधा

lungs

काळजी घ्या ! महामारीत सर्वात जास्त त्रास मलाच; आपल्या फुफ्फुसाचे भावनिक मनोगत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : आजच्या कोरोना महामारीत व प्रदूषित वातावरणाचा सर्वात जास्त त्रास मलाच सहन करावा लागतो. माझा सतत बाहेरील हवेशी संपर्क येत असतो. शरीरातील पेशींना आवश्यक असा प्राणवायू हवेतून मिळवून देण्याची जबाबदारी माझ्यावरच असते. तुमच्या छातीच्या पिंजऱ्यात आम्ही जोडीने राहतो. सर्व काम जोडीनेच करतो. माझ्या उजव्या भागात तीन कप्पे असतात तर डाव्या भागात दोनच असतात आम्ही आतून स्पंजाप्रमाणे असतो.

तुम्ही जन्माला येतात तेव्हा गुलाबी असतो. पण नंतर तुम्ही हवेतून इतके घाणेरडे पदार्थ श्वासावाटे घेता की आमचा रंग काळपट करडा होत जातो.

माझे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही दिवसभरात काही वेळा तरी माझ्या सर्वांगाला काम दिले पाहिजे. तुम्हाला धाप लागेल असा व्यायाम केला पाहिजे. भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम या प्राणायामाचाही माझे आरोग्य सुधारण्यासाठी चांगला उपयोग होतो.

हेही वाचा - विनाकारण फिरत असाल तर वाहन होईल जप्त

माझी लवचिकता वाढते धूम्रपान व प्रदूषित हवा हे माझे सर्वात मोठे शत्रू आहेत. निसर्गाने तुमच्या श्वसननलिकेची योजना हवा आत घेण्यासाठी केलेली आहे. बिडी, सिगारेटचा धुर घेण्यासाठी नाही याची आठवण तुम्ही ठेवायला हवी. तुमच्या प्रदूषित हवेला व कोरोनाच्या विषाणूला तोंड देता येईल असे पुरेशी उपाय माझ्याकडे नाहीत. यामुळे खोकला, दमा, न्युमोनिया, क्षयरोग व कॅन्सर अशा मला होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते आहे. हवेतील प्रदूषण या प्रमाणेच तुमच्या प्रदूषणाचाही दुष्परिणाम माझ्यावर होतो.

या कोरोना महामारीत माझे आरोग्य चांगले राहण्यासाठी सातत्याने सकाळी योग व प्राणायाम करत जा. घराबाहेर जाताना तोंडाला मास्क लावूनच जा. गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाऊ नका. मला तेथेच जास्त धोका आहे. हात जोडून विनंती करतो की तुम्ही घरीच सुरक्षित आहात बाहेर नाही. ऐकाल ना...?

तुमच्यासाठी व माझ्यासाठी..!

हा संदेश सोशल माध्यमावर व्हायरल होतोय.