Corona Increase | नांदेडकरांनो रहा सतर्क, कोरोना संसर्गात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient
नांदेडकरांनो रहा सतर्क, कोरोना संसर्गात वाढ

नांदेडकरांनो रहा सतर्क, कोरोना संसर्गात वाढ

नांदेड : नवीन वर्षात जानेवारी महिन्यात एक तारखेपासून दररोज कोरोना रुग्णांची(Corona Patient) संख्या जिल्ह्यात वाढत चालली आहे. शहरातही रुग्णसंख्या वाढल्यामुळे रुग्णालयांमध्येही गर्दी होत आहे. त्यामुळे नांदेडकरांनी (Nanded) आता सतर्क राहण्याची गरज आहे. कोविडपासून दूर राहण्यासाठी मास्क, सॅनिटायझर(Sanitizer) व गर्दीपासून दूर राहणे हा सर्वोत्तम उपाय आहे. नागरिकांनी याचे अधिक गांभीर्याने पालन करणे गरजेचे आहे. दरम्यान, महापालिकेतर्फे लसीकरणासह दंडात्मक कार्यवाहीसाठी १५ पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा: सावधगिरी बाळगा, नाहीतर पुन्हा धोका; संयुक्त राष्ट्राचा भारताला इशारा

नांदेड शहरात या आठवड्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. जिल्ह्यात गत दोन तीन दिवसांपासून दररोज चारशेच्यावर बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. जिल्ह्यात अधिकाधिक प्रमाणात लसीकरण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे स्वत: प्रत्येक गावनिहाय आढावा घेत असून सर्व यंत्रणांचा समन्वय साधून प्रत्येक विभाग प्रमुखांना यात दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

नांदेडला कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेतर्फे कोविड लसीकरण आणि दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी १५ पथकांची नेमणुक आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरिष कदम यांच्या नियंत्रणाखाली ही पथके कार्यान्वित करण्यात आली आहे. नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त अजितपालसिंघ संधू, शुभम क्यातमवार आणि पंजाब सोनसळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी दैनंदिन कार्यवाहीचा अहवाल सिस्टिम मॅनेजर सदाशिव पतंगे यांच्याकडे दररोज सायंकाळी पाच वाजता आयुक्त यांच्या कक्षात सादर करायचा आहे.

हेही वाचा: ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाहीत : वडेट्टीवार

वारंवार स्वच्छ पाण्याने हात धुवा

  • समोरच्या व्यक्तीपासून किमान दोन मीटर सुरक्षित अंतर ठेवणे

  • कोरोना रुग्ण घरात असल्यास फर्शी नियमितपणे निर्जंतूक करा

  • कोणत्याही साबणाने अंघोळ करावी.

अँटीबँकटेरियल साबणाचा आग्रह धरू नका. कारण, कोरोना हा जीवाणू नाही

  • गर्दीत जाऊ नका

  • मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका

  • नाक, डोळे, तोंड यांना अनावश्यक स्पर्श करू नका

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून वाद; 'मविआ'चं प्रत्युत्तर

महापालिकेत नियंत्रण कक्ष

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नांदेड वाघाळा महापालिकेतील मुख्य इमारतीत क्रमांक ३०५ येथे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी हेल्पलाईन (०२४६२ - २६२६२६) उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर हेल्पलाईनवर जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थेशी निगडीत पुरविल्या जाणाऱ्या सेवांची माहिती (उदा. शिल्लक खाटांची संख्या, रुग्णालय संपर्क क्रमांक, कोरोना चाचणी सेंटरची माहिती आदी.) देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन, आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली आहे.

'कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याकडे लक्ष द्यावे. प्रशासनातर्फेही व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी देखील कोविड नियमांचे पालन करत अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे.'

- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nanded(corona increases)
loading image
go to top