अर्धापुरात अतिक्रमण काढण्यास सुरूवात, प्रशासनाचे नागरिकांतून स्वागत.

लक्ष्मीकांत मुळे
Saturday, 10 October 2020

दुपारनंतर अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य केले.तर ही कार्यवाही सुरू आसतांना बघ्यांची एकच गर्दी झाली होती.ही अतिक्रमण विरोधी मोहीम शुक्रवारी (ता नऊ ) सकाळी सुरू झाली ती सायंकाळ पर्यंत सुरू होती.

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : शहरातील तहसील कार्यालयाच्या समोरील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. अतिक्रमण धारकांनी सुरूवातीला तिव्र विरोध केला. पण प्रशासनाने आपली कार्यवाही  लावून धरून ठाम राहिल्याने दुपारनंतर अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य केले. तर ही कार्यवाही सुरू आसतांना बघ्यांची एकच गर्दी झाली होती. ही अतिक्रमण विरोधी मोहीम शुक्रवारी (ता. नऊ ) सकाळी सुरू झाली ती सायंकाळपर्यंत सुरू होती. पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण हाटविण्यात आले आहे.

शहरातील विविध भागात शासकीय जागेवर बिनधास्तपणे अतिक्रमण करण्यात आले असून शहराला बकाल स्वरूप आले आहे. या अवैध अतिक्रमणा विरुद्ध पोलिस, महसुल, बांधकाम, नगरपंचायत विभागाने संयुक्त कार्यवाही करून अतिक्रमण हाटविण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा -  पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट, शुक्रवारी २२२ जण कोरोनामुक्त, १७० पॉझिटिव्ह

जिल्हाधिक-यांनी जमीन हास्तांतराचे आदेश दिले होते

शहरातील तहसील कार्यालयाच्या समोरील गटक्रमांक 600 मधील काही भागात नगरपंचायत व्यापारी संकूल बांधण्यात येणार आहे.या बांधकामासाठी नगरपंचायतीने महसुल प्रशासनाला जागा मागितली होती. जिल्हाधिक-यांनी जमीन हास्तांतराचे आदेश दिले होते.सदरील जमिनीवरील  अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्तात सकाळी सुरूवात झाली .अतिक्रमणधारकांनी सकाळी तिव्र विरोध करित कार्यवाही थांबविण्याचे प्रयत्न केला.पण.प्रशासन आपल्या कार्यवाहीवर ठाम राहिले.तहसीलदार सुजित नरहरे,पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, नगरअभियंता नागनाथ देशमुख,नायब तहसीलदार मारोतराव जगताप यांनी कायदेशीर बाजू समजावून सांगून अतिक्रमणारकांना सहकार्य करण्याचे सांगितले. 

पोलिस बंदोबस्तात ही कारवाई 

सकाळी कार्यवाही सुरू आसतांना जो विरोध झाला तो दुपार नंतर कमी झाला.अतिक्रमणधारकांननी सहकार्य केले.ही कार्यवाही सुरू आसतांना बघ्यांची एकच गर्दी झाली.काही काळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस बंदोबस्तात ही कार्यवाही करण्यात आली.ही कार्यवाही करण्यापुर्वी एक दिवस आगदोर लोकप्रतिनिधी व अतिक्रमण धारकांची बैठक घेवून प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

येथे क्लिक कराअर्धापूर : शहराच्या विविध भागात कच-याचे ढिग, सत्ताधारी नगरसेवकात बेबनाव

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले 

अर्धापूर शहरातील विविध शासकीय जागा, गायराण,नाले, रस्ता आदी सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत .जागा धराणे, टपरी टाकने व किरायने देणे आसा गोरखधंदा सुरू आहे. यातून वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. शहरातील विविध भागातील अतिक्रमणा विरुद्ध धडक मोहीम घेण्यात यावी आशी मागणी होत आहे. अर्धापुरात अतिक्रमण काढण्यास सुरूवात, अतिक्रमणधारकांचा अधि विरोध नंतर सहकार्य..प्रशासनाचे नागरिकांतून स्वागत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beginning to remove encroachments in Ardhapur, administration welcomes citizens nanded news