प्रवाशांनो सावधान : एसटी बसमध्ये महिला चोर सक्रीय; वृद्ध महिलेचे दोन लाख लंपास

सकाळी साडेनऊ ते अकराच्या सुमारास त्या नांदेड मध्यवर्ती बस स्थानकावरुन सदर बसमध्ये बसल्या. यावेळी त्यांच्याजवळ सहप्रवाशी म्हणून तीन महिला गेल्या.
क्राईम न्यूज नांदेड
क्राईम न्यूज नांदेड

नांदेड : नांदेड ते मुखेड असा एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या एका ६५ वर्षीय महिलेस चांगलाच धक्का बसला. त्याचे झाले असे की, सहप्रवासी तीन महिलांनी त्यांची नजर चुकवत त्यांच्या पर्समधील दोन लाख रुपये लंपास केले. हा प्रकार काकांडी ते मारतळा दरम्यान मंगळवारी (ता. २९) जून रोजी घडला. या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात अनोळखी तीन महिलांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बस (एमएच २६- बीएल- ४००३) मध्ये प्रभावती भुजंगराव राठोड (वय ६५) राहणार परवानानगर, मुखेड ह्या नांदेड ते मुखेड असा मंगळवारी (ता. २९) एकट्याच प्रवास करत होत्या. सकाळी साडेनऊ ते अकराच्या सुमारास त्या नांदेड मध्यवर्ती बस स्थानकावरुन सदर बसमध्ये बसल्या. यावेळी त्यांच्याजवळ सहप्रवाशी म्हणून तीन महिला गेल्या. शेजारी जागा असल्याने प्रभावती राठोड यांनी त्यांना जागा दिली. परंतु त्यांना काय माहिती की ह्या सर्व चोर आहेत म्हणून. सुरुवातीला श्रीमती राठोड यांना बोलण्यात गुंग ठेवून त्यांच्याजवळ असलेल्या पर्समधील रोख दोन लाख रुपये हातोहात काढून घेतले.

हेही वाचा - सहस्त्रकुंड येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेला नामदेव कैलवाड याने कंत्राटी मजूराकडून बक्षिस म्हणून दीड हजार स्विकारताच अडकला एसीबीच्या जाळ्यात

त्यानंतर ह्या महिला त्यांना बोलतच राहिल्या. तोपर्यंत बस ही गडगा गावावर आली. यावेळी मुखेडचे तिकीट काढलेले असताना ह्या तिघीही गडगा येथे उतरल्या. पुढे बस मुखेड बसस्तानकावर पोहचल्यानंतर श्री. राठोड यांनी आपल्या पर्सची चैन उघडी असल्याचे दिसले. व आत ठेवलेली रोख रक्कम लंपास झाली होती. त्यांना एकच धक्का बसला. कसेबसे सावरत त्यांना वाहक व काही प्रवाशांनी खाली उतरवले. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर घडलेला प्रकार श्रीमती राठोड यांनी नातेवाईकांना सांगितला.

यानंतर प्रभावती राठोड यांना सोबत घेऊन नातेवाइकांनी मुखेड पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना रीतसर घटनेची माहिती देऊन प्रभावती भुजंगराव राठोड यांच्या फिर्यादीवरुन मुखेड पोलिसांनी अनोळखी तीन महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री केंद्रे करत आहेत.

येथे क्लिक करा - Good News : मुलीने आईची बियांनी तुला करुन केली एकसष्टी ; विधायक उपक्रम

नांदेड शहराच्या जुना कौठा बाजारातून मोबाईल चोरीला

रमेश भोसले राहणार दौलतपुर तालुका बिलोली हा व त्याचा मित्र साई मंदिर कमानीजवळ भाजीपाला खरेदी करत असताना ता. 29 जूनच्या सायंकाळी चारच्या सुमारास त्यांच्याजवळील २० हजार ५०० सॅमसंग कंपनीचा मोबाइल अज्ञात चोरट्यांनी चोरला. रमेश बाबाराव भोसले यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक सुंकमवार करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com