Good News : मुलीने आईची बियांनी तुला करुन केली एकसष्टी ; विधायक उपक्रम

या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी वृक्षमित्र परिवाराच्या अर्चना मुखेडकर यांनी घेतली होती. त्यांची अनेक दिवसांपासून अशी इच्छा होती.
बियांनी केली तुला
बियांनी केली तुला

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाऊंडेशन तर्फे नांदेड शहर परिसरात हरित नांदेड अभियानांतर्गत गत दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने वृक्ष लागवड मोहीम सुरु आहे. तसेच वृक्षमित्र फाऊंडेशन पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबवित आहे. त्यामधील एक उपक्रम म्हणजे दुर्मिळ व पर्यावरणपूरक झाडांच्या बियांच्या जतन करुन त्यांचे रोपात रुपांतर करणे व लागवड करणे असा उपक्रम गेल्या वर्षभरापासून सुरु होता.

या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी वृक्षमित्र परिवाराच्या अर्चना मुखेडकर यांनी घेतली होती. त्यांची अनेक दिवसांपासून अशी इच्छा होती. त्यांनी संकल्प केला की त्यांची आई श्रीमती सुमन सुधाकरराव पदमवार यांचा 61 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमवलेल्या बियांनी एकसष्टी निम्मित तूला करावी. या उपक्रमासाठी जास्तीतजास्त बिया लागणार होत्या. यासाठी वृक्षमित्रांनी नियोजन केले व व्हाट्सअ‍ॅप व फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रात सगळीकडे बीजतूला उपक्रमाचा प्रचार प्रसार करण्यात आला. त्या माध्यमातून सगळीकडून भरपूर प्रतिसाद मिळाला व त्यांच्या आईंच्या वजनापेक्षा अधिक बिया जमा झाल्या. यामध्ये अर्जुन, साग, कदंब, पारस पिंपळ, गुंज, करंज अशा विविध पर्यावरण पूरक बिया जमा झाल्या. सर्वानी मिळून एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे नियोजन केले. ज्यामुळे समाजात एक चांगला संदेश देण्यात येईल.

हेही वाचा - इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या हाफमध्ये डागले दोन गोल

रविवार ता. 27 जून रोजी वृक्षमित्र परिवाराच्या सदस्या अर्चना मुखेडकर यांच्या आई सुमन सुभाषराव पदमवार यांचा एकसष्टी निम्मित बीज तूला कार्यक्रम घेण्यात आला. तूला झालेल्या बियांचे मोजमाप करण्यात आले सर्व बिया एक लाख 51 हजारपेक्षा अधिक वजनात भरल्या. या सर्व बियांचा वापर करण्याची जबाबदारी वृक्षमित्र फाऊंडेशनच्या सदस्यांनी घेतली. यांचा वापर रोपे तयार करुन व सीडबॉलच्या साहयाने वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात करण्यात येईल.

या आनंददायी सोहळ्यात प्रमुख उपस्थिती शहराच्या महापौर मोहिनी येवनकर, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, वनपरिक्षेत्रीय अधिकारी सुषमा मोतेवार, जि. प. सदस्या प्रणिता देवरे, मनपाचे उद्यान अधीक्षक डॉ. फरहत बेग यांच्या उपस्थितीत बीज तूला करण्यात आली. याप्रसंगी महापौर मोहिनी येवनकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व हा आगळा वेगळा उपक्रम महाराष्ट्रातील पहिलाच असण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच शहरातील नागरिकांना आवाहन केले की असे उपक्रम राबवून वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन कार्यात हातभार लावून हरित नांदेड अभियानात योगदान द्यावे.

येथे क्लिक करा - वडिलांवर झालेल्या टीकेने कन्या खवळली. पात्रता नसताना राजकीय पद मिळालं की असं होतं...

या कार्यक्रमात वृक्षमित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर, कैलास अमिलकंठवार, प्रल्हाद घोरबांड, सचिन जोड, गणेश साखरे, चैतन्य पिंपळडोहकर, डॉ. चिमणे, प्रशांत रत्नपारखी, राज गुंजकर, नामदेव माने, अरुणपाल ठाकूर, शिवम अग्रवाल, प्रल्हाद मोरलवार, प्रताप खरात, लक्ष्मण गज्जेवार, लोभाजी बिराजदार तसेच पद्मवार कुटुंबातर्फे अश्विन पद्मवार, संतोष पद्मवार आणि साई येरावार आदी सदस्य व स्नेही सहकुटुंब उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com