Bharat Jodo Yatra : ‘पीकविम्यासाठीचा पैसा जातो कुठे?’ ; राहुल गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Bharat Jodo Yatra : ‘पीकविम्यासाठीचा पैसा जातो कुठे?’ ; राहुल गांधी

कळमनुरी : शेतकरी पीकविम्यासाठी पैसे भरतात. पण, नुकसान झाल्यानंतरही पीकविम्याची रक्कम मिळत नाही. मग शेतकऱ्यांनी भरलेला पैसा जातो कुठे, असा सवाल कॉंग्रेसचे नेत, खासदार राहुल गांधी यांनी केला. भारत जोडो यात्रेदरम्यान येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड तसेच प्रणिती शिंदे, रजनी सातव, डॉ. प्रज्ञा सातव, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.

राहुल म्हणाले, पदयात्रेदरम्यान आज एक शेतकरी भेटला.तो म्हणाला समोर माझे शेत आहे. त्याचे शेत पाहिले. सोयाबीन हातून गेले होते. त्याने पंतप्रधान पीकविम्यासाठी पैसे भरूनही त्याला भरपाईपोटी विमा रक्कम मिळाली नाही. मग हे पैसे गेले कुठे? ते हवेत तर गेले नाहीत ना? हा पैसा कुणाच्या तरी खिशात गेला?’. या देशात तीन -चार अब्जाधीश काहीही करू शकतात. त्यांनी रस्ते, बंदरे विमानतळ घेतले. पण, महागाई, बेरोजगारीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली, असेही ते म्हणाले.

राजीव सातव यांची आठवण

ॲड. राजीव सातव आपल्यात नाहीत, याचे दु:ख वाटते. ते माझे मित्र होते. ते अधिक चांगले काम करत होते. त्यांची भेट व्हायची तेव्हा तुमचाच आवाज त्यांच्या तोंडून निघायचा. ते स्वतः विषयी कधी बोललाच नव्हते. आज आनंद याचा आहे, की त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या पदयात्रेत दिवसभर सोबत होत्या, असे राहुल म्हणाले.