Bharat jodo yatra : भारत जोडो यात्रा म्हणजे स्वातंत्र्याचा दुसरा सत्याग्रह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded

Bharat jodo yatra : भारत जोडो यात्रा म्हणजे स्वातंत्र्याचा दुसरा सत्याग्रह

बारड : काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा म्हणजे स्वातंत्र्याचा दुसरा सत्याग्रह असून या लढ्यात तीन हजार कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचा निर्धार केला असल्याचे माजी पंचायत समिती उपसभापती सुनिल सुधाकरराव देशमुख बारडकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला आहे.

बारड नगरीत भारत जोडो यात्रेनिमित्त शुक्रवारी (ता.चार) रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार निवघेकर अध्यक्षस्थानी होते. भाऊराव चव्हाण कारखान्याचे संचालक शिवाजीराव पवार, निलेश देशमुख बारडकर, किशोर देशमुख, माजी उपसभापती आनंदराव गादीलवाड, ज्येष्ठ नेते उत्तमराव लोमटे, माजी सरपंच श्रीनिवास महादवाद, बालाजी आमरे, शेख दौलत, यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी राहुल गांधी यांच्या भारत जोडो पद यात्रेच्या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार निवघेकर यांनी केले. तर महागाई, एकाधिकारशाही, आरजकता आणि बेरोजगारी समस्येच्या विरोधात खासदार राहुल गांधी यांनी ही यात्रा काढली असून त्यांचे हात बळकट करावयाचे आहेत अशी अपेक्षा माजी उपसरपंच प्रताप देशमुख यांनी या वेळी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली तीन हजार कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचा निर्धार केला असून बारड ते भोकर फाटा दुचाकी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

काँग्रेस कार्यकर्ते भोकर फाटा येथून भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील देशमुख यांनी सांगितले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल आठवले, विश्वनाथ लाहेवार, गंगाधर लोमटे, शंकरराव लोमटे, बालाजी लोणवडे, शेख जावेद, शेख माजीद, रामकीसन माने, दीपक माने, डॉ. आनंदा कांबळे, आनंदा पवार, युवक काँग्रेसचे कृष्णा देशमुख, विनोद कोरे, शकील शेख, किशोर पिलेवाड, विनोद मूगटकर गोंविद माळकोठे, प्रेमचंद चवरकर, सिद्धार्थ आठवले, अनुराग बारडकर, दिगंबर वचेवार, शंकर देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते नरसिंग आठवले यांनी केले.