Bharat jodo yatra : नांदेड शहरातील वाहतूक मार्गात बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra

Bharat jodo yatra : नांदेड शहरातील वाहतूक मार्गात बदल

नांदेड : भारत जोडो यात्रेमुळे गुरूवारी शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी वाहतूकीच्या नियमात हा बदल केला असून रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच पोलीस अधिक्षक कार्यालयाने परवानगी दिलेल्या वाहनाला या अधिसुचनेतुन मोकळीक देण्यात आली आहे. गुरुवारी (ता. दहा) दुपारी चार ते रात्री अकरा वाजेपर्यत नागपुर-हिंगोलीकडुन येणारी वाहतुक सर्व प्रकारची वाहने जाणे - येण्यासाठी पूर्ण बंद राहील. नरसीकडुन नांदेडकडे जाणे - येण्यासाठी पूर्ण बंद राहील. चंदासिंग कार्नर ते ढवळे कार्नर, चंदासिंग कार्नर - वाजेगाव - देगलुर नाका - बाफना - रेल्वे स्टेशन पूर्ण बंद राहील.

महाराणा प्रताप चौकाकडुन बाफना टी पॉईन्टकडे तसेच महाराणा प्रताप चौकाकडुन हिंगोली गेट, चिखलवाडीकडे जाणे - येण्यासाठी बंद राहील. रेल्वे स्थानक - शिवाजी महाराज पुतळाकडुन गांधी पुतळ्याकडे व वजीराबाद चौकाकडे वाहतुक बंद राहील. महावीर चौक ते शिवाजी महाराज पुतळ्याकडे बंद राहील. महावीर चौक ते वजीराबादकडे बंद राहील. जुना कौठा - रामसेतु पुल -तिरंगा चौक - वजीराबाद चौककडे येणारी वाहतुक वजीराबाद चौक ते आयटीआय चौक बंद राहील.

आयटीआय चौक ते अण्णा भाऊ साठे पुतळ्याकडे आणि परत आयटीआय चौक ते राज कार्नर - आसना ब्रिजकडे जाणे - येण्यासाठी बंद राहील. आसना ब्रिज ते शंकरराव चव्हाण चौकाकडे जाणे - येण्यासाठी बंद राहील. भोकर फाटा ते नांदेडकडे येणारी वाहतुक आसना पुलापर्यंत बंद राहील. त्यामुळे या ऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहनधारकांना करण्यात आले आहे.