esakal | आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबासोबत भाऊभीज साजरी होणार, पुण्यातील मामा नांदेडला येणार..
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पुणे येथील भोई प्रतिष्ठानाच्या पुढाकारतून अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबातील पाल्यासांठी गेल्या तीन वर्षापासून पुण्यजागार प्रकल्प राबविण्यात  येत आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबासोबत भाऊभीज साजरी होणार, पुण्यातील मामा नांदेडला येणार..

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : दिवाळीच्या सणात भाऊबीजेला एक विशेष आसे महत्व आसते. भाऊ बहिणीच्या आतूट नात्यांचा सण म्हणजे भाऊबीज. यंदा पुणे येथील मामा दिवाळीच्या  भाऊबीजेला बुधवारी (ता 18) नांदेडला येत असून अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबासोबत भाऊबीज साजरी करणार आहेत.

पुणे येथील भोई प्रतिष्ठानाच्या पुढाकारतून अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबातील पाल्यासांठी गेल्या तीन वर्षापासून पुण्यजागार प्रकल्प राबविण्यात  येत आहे. या प्रकल्पातून शैक्षणिक, व्यवसायीक मार्गदर्शन व मदत केली जात आहे. दरवर्षी अर्धापूर तालुक्यातील दहा शेतकरी कुटुंब पुण्यातील विविध कुटुंबात दिवाळी साजरी करण्यासाठी जात आसतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे शेतकरी कुटूंब पुण्याला जाऊ शकले नाही. त्यामुळे बच्चे कंपनीला हुरहूर लागली होती.

हेही वाचा नांदेड : जास्त प्रवासी भाडे आकारणाऱ्या बसेसवर कारवाई- प्रवाशांना तक्रार नोंदविण्याचे आवाहन -

सामाजिक जाणिवेतून शेतकरी कुटूंबासोबत भाऊबीजीचे आयोजन नांदेड येथील श्री संत पाचलेगावकर मुक्तेश्वर आश्रम नांदेड येथे आयोजन करण्यात आला आहे. यावेळी पोलिस अधीकक्ष प्रमोद शेवाळे, सहाय्यक धर्मदायुक्त साकेत कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, शंतनु डोईफोडे, विजय जोशी, सुधाकर टाक, रूपेश पाडमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हा कार्यक्रम बुधवारी (ता. १८) दुपारी बारा वाजता होणार आहे.

पुण्यजागर प्रकल्पाच्या माध्यमातून रक्षा बंधन, व्यवसायिक प्रक्षिण, दिवाळ , शेतकरी कुटूंबातील पाल्यासांठी शिष्यवृत्ती आदी उपक्रम राबवून अधार देण्यात येत आहे. यंदा आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या पत्नींनी दहावीची परीक्षा दिली होती. यात लक्ष्मी साखरे ह्या उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पुण्यजागर प्रकल्पातील शेतकरी कुटूंबातील सदस्यांनी उपस्थित रहावे असें आवाहन भोई प्रतिष्ठानचे आध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, पुण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, नागोराव भांगे, गुणवंत विरकर, शेख साबेर यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे