नांदेड : भोकर तालुक्यातील श्रीक्षेत्र पाळज येथील प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर निघालेल्या भाविकांवर काळाने (Nanded Car Accident) घाला घातला. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात बुधवारी रात्री भोकर–म्हैसा रोडवरील नांदा शिवार परिसरात घडला.