esakal | भोकर डाक कार्यालय नॉटरिचेबल !
sakal

बोलून बातमी शोधा

Post Office

भोकर डाक कार्यालय नॉटरिचेबल !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोकर : प्रारंभी एकमेकातील सुसंवाद साधण्यासाठी डाक विभाग एकमेव साधन होते. दरम्यानच्या काळात मरगळ आली. कालातंराने विज्ञान युगात संबंधीत कार्यालयात बरीच प्रगती झाल्याने ग्राहकांची होणारी गैरसोय दूर झाली. शहरातील डाक विभागात मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विस दिवसांपासून आर्थिक व्यवहार बंद झाल्याने ग्राहकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वरिष्ठांनी त्वरीत लक्ष देऊन चौकशी करून ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. अशातच भोकर शहरातील डाक विभागात अधिकारी आणि ग्राहकांत योग्य समन्वय नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील डाक विभागात सेव्हिंग बचत खाते, सुकन्या योजनासह होणारे आर्थिक व्यवहार मागिल विस दिवसांपासून चक्क बंद झाले आहेत. नेटवर्क आणि पासवर्ड नाही असे सांगून अधिकारी व कर्मचारी मोकळे होत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थी ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. ग्राहकाना सौजन्याची वागणूक मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.

"भोकर शहरातील डाक विभागात नेटवर्क बाबत संबधीतांनी आमच्याकडे माहिती दिली आहे. दोन दिवसांत यावर तोडगा काढून ग्राहकांची होणारी गैरसोय दूर केली जाणार आहे. ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे."

- माधव राव, डाक अधिक्षक, नांदेड.

loading image
go to top