मोठी बातमी : अतिवृष्टीचा धोका, या आठवड्यात अशी घ्या काळजी- प्रदीप कुलकर्णी

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 14 October 2020

ता. १३ ते ता. १७ ऑक्‍टोंबर या काळात नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यासह विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

नांदेड : येणाऱ्या शनिवार (ता. १७) ऑक्‍टोंबरपर्यंत अती मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी ता. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता सुचना दिल्या आहेत. त्या सूचनेनुसार ता. १३ ते ता. १७ ऑक्‍टोंबर या काळात नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यासह विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात सद्या गोदावरी नदीसह सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. सद्या जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विष्णुपूरीसह अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. हा धोका कायम असतानाच पुन्हा प्रादेशीक हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला. मात्र यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून त्यांनी नागरिकांना काही महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. 

हेही वाचास्लोमोशनमुळे मोठा अपघात टळला, सचखंडचे तीन डब्बे निसटले -

या गोष्टी करा 

ँ ँ विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा, जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आश्रय नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालुन बसा.
ँ ँ आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या, किंवा घराच्या बाल्कनी अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
ँ ँ आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
ँ ँ तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूपासून दूर राहा.
 ँ पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

येथे क्लिक करानांदेड प्रशासनाने कसली कंबर, अवैध वाळूचा उपसा करेल अंदर -

 या गोष्टी करू नका 

 ँ आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका.ँ ँ शॉवरखाली आंघोळ करू नका.
 ँ घरातील बेसिनचा नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका. तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.  
 ँ विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या साह्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
ँ ँ उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
 ँ धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका आणि जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबण्या इतकेच धोकादायक असते. या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेडचे प्रदीप कुलकर्णी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big news: Danger of heavy rains, take care this week Pradip Kulkarni nanded news