मुदखेड शहरात जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद, शहर १०० टक्के बंद

गंगाधर डांगे
Wednesday, 16 September 2020

मुदखेड शहरातील नागरिकांनी जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तीने चालवण्याचा निर्णय घेतला व ता.१३ सप्टेंबरपासून ता.२० सप्टेंबर पर्यंत असा सात दिवसाचा जनता कर्फ्यू लाकडावून  पाळण्याचे ठरवले त्यानुसार आज दुसऱ्याही दिवशी मुदखेड करांनी मोठा प्रतिसाद दिला.

मुदखेड (जिल्हा नांदेड) - मुदखेड शहर व तालुक्यामध्ये कोरोणाच्या रुग्ण संख्येमध्ये झपाट्याने मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून तालुका भारत या आजारामुळे मोठी भीती निर्माण झालेली दिसत आहे. 

यामुळे मुदखेड शहरातील नागरिकांनी जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तीने चालवण्याचा निर्णय घेतला व ता.१३ सप्टेंबरपासून ता.२० सप्टेंबर पर्यंत असा सात दिवसाचा जनता कर्फ्यू लाकडावून  पाळण्याचे ठरवले त्यानुसार आज दुसऱ्याही दिवशी मुदखेड करांनी मोठा प्रतिसाद दिला.

शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

जगभरात कोरोणा विषाणूने थैमान घातले असून लाडावून काळामध्ये मुदखेड शहर व तालुक्यात एकही रुग्ण आढळला नव्हता परंतु मागील ऑगस्ट महिन्यापासून मुदखेड शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत तालुक्यातील रुग्णांच्या संख्येचा आकडा ४००च्या पुढे गेला असल्याचे समोर येत आहे यामध्येच या सप्टेंबर महिन्यामध्ये मुदखेड शहरात दोन जणांचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा  Video - नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाने सात मंडळात अतिवृष्टी 

अत्यावश्यक सेवेत असलेल्या लोकांना कोरोणाची लागण मोठ्या प्रमाणात

शहरातील दोन नागरिकांचा कोरोणा मुळे झालेला मृत्यू व डॉक्टर, मेडिकल चालक, व्यापारी, पोलीस या अत्यावश्यक सेवेत असलेल्या लोकांना कोरोणाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे शहरातील नागरिकांमध्येच नव्हे तर ग्रामीण भागात देखील कोरोणा ची लक्षणे असलेल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे या भीतीपोटी व संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ता.१२ रोजी व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनास विनंती करून मुदखेड पालिकेच्या कै. शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये प्रतिष्ठित व्यापारी, राजकीय पुढारी, नगरसेवक, विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, पत्रकार यांची एक बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्वानुमते सात दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचे पारित केले यादरम्यान शहरांतील सर्व व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून ऊन सात दिवस म्हणजेच ता.२० पर्यंत बंद पाळण्याचे ठरवले व तारीख तेरा पासून या बंदला सुरुवात झाली दरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा याचबरोबर शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी मुदखेड पालिकेचे मुख्याधिकारी राम राजे  कापरे, मुदखेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सूनील निकाळजे, मुदखेड पालिकेचे नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार, उपनगराध्यक्ष बालाजी गोडसे, बंदेअली पठाण संजय अलवार, संदीप पाटील गाडे ,माधव पाटील कदम भाजपाचे प्रवीण गायकवाड शिवसेनेचे सचिन चंद्रे सचिन माने आदींनी विशेष प्रयत्न केले आहे

येथे क्लिक करा - धक्कादायक : बारडच्या कोविड केंद्रातून बाधित रुग्ण पळाला, गुन्हा दाखल -

मुदखेड शहरात पालिकेच्या वतीने यादरम्यान शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे.

मुदखेड शहरवासीयांनी कोरोणाचा तालुक्यात वाढता प्रभाव पाहता या प्रकरणाची वाढती साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू चा जो निर्णय घेतला व या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात मुदखेड ची जनता करीत आहे या बाबीचे व मुदखेड वासियांचे पोलीस प्रशासन कौतुक करते असाच प्रतिसाद जनतेने सात दिवस द्यावा दरम्यान घराबाहेर पडू नये, तोंडाला मास्क बांधावे, सॅनिटायजर चा वापर करावा सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे व प्रशासनास मदत करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सूनील निकाळजे यांनी आज केली आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big response to public curfew in Mudkhed city, city closed 100 percent nanded news