esakal | नांदेडच्या गोदावरी तीरावर पक्षी सप्ताहाचा पक्षी निरीक्षणाने शुभारंभ    
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली आणि पदमविभूषण स्व.डॉ सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त 

नांदेडच्या गोदावरी तीरावर पक्षी सप्ताहाचा पक्षी निरीक्षणाने शुभारंभ    

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : गोदावरी तीरावर पक्षी सप्ताहाचा पक्षी निरीक्षणाने शुभारंभ झाला असून राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकांचे महत्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी याकरिता शासन प्रयत्नशील आहे. राज्य प्राणी, पक्षी, वृक्ष, फुल, फुलपाखरू, कांदळवन वृक्ष, अशी मानचिन्हे शासनाने घोषित केली आहेत. पक्षी हा सृष्टीतील महत्वाचा घटक आहे. 

जगभरातील पक्षांची जैवविविधता झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत असून अनेक पक्षी प्रजाती दुर्मिळ श्रेणीत समाविष्ठ होत आहेत. राज्यातील पक्षांचे महत्व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या संरक्षणाप्रती त्यांच्या संरक्षण प्रति जबाबदारी स्पष्ट व्हावी ह्यासाठी व्यापक जनजागृती होण्याची गरज आहे. देशात आणि राज्यात पक्षी संवर्धन आणि संशोधनाच्या क्षेत्रात व्यापक काम झालेले आहे. भारतीय पक्षीविश्व व पक्षीअभ्यासशास्त्रास जागतिक स्तरावर पोहोचविणारे पद्मविभूषण स्व. डॉ सलीम अली आणि पक्षी अभ्यासक व लेखक अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर हा काळ पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले आहे.

हेही वाचा -  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खबरदारी घेतली नाही तर....
 

पक्षी सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते 

त्यानुसार गुरुवारी (ता. पाच) नांदेड येथील गोदावरी नदीच्या काठावर, पक्षीमित्र, वन्यजीव छायाचित्रकार विजय होकर्णे  यांच्या पुढाकारातून आणि निसर्ग मित्र मंडळ आणि पक्षी मित्रांच्या सहकार्यातून या पक्षी सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपवन संरक्षक राजेश्वर सातेलीकर, परिविक्षाधीन वन अधिकारी मधुमीता आणि सहाय्यक वनसंरक्षक डी. एस. पवार यांच्यासह निसर्ग, पक्षी प्रेमी नागरिक, छायाचित्रकार उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी पक्षी सप्ताहाचे महत्त्व विशद केले. पक्षी सप्ताहाच्या आयोजनाची भुमिका मांडतांना पक्षीप्रेमी वन्यजिव छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी शासकीय यंत्रणा व पक्षीमित्र, संशोधकांच्या माध्यमातून बर्ड्स ऑफ नांदेडची निवड करण्याचा मनोदय व्यक्त केला. यासाठी नांदेड जिल्ह्यात अधिवास असलेल्या पक्षांचे निरीक्षण, अभ्यास करून या बाबत अभ्यासू तज्ञ पक्षीमित्र नागरिकांची मते जाणून घेऊन नांदेडचा पक्षी जाहीर करण्यात यावा अशी सुचना मांडली आणि नांदेड व विदर्भाच्या सीमेवर पैनगंगा नदीतीरावर असलेल्या पक्षी अभयारण्याचे जतन करून संरक्षण करण्यात यावे अशी अपेक्षाही त्यांनी बोलताना व्यक्त केली.

इस्लापुरचे हरणखरब सुंदर विकसित 

वन विभागाच्या वतीने या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर यांनी दिली. या निमित्ताने मारुती चितमपल्ली व डॉ. सलीम अली यांच्या कार्याचा गौरव करून उपवन संरक्षक राजेश्वर सातेलीकर म्हणाले की, नांदेड परिसरातील पक्षाची आवासस्थाने शोधून संरक्षण करण्याची जबाबदारी पक्षीमित्रांनी घ्यावी, परिविक्षाधीन अधिकारी मधूमिता यांनी इस्लापुरचे हरणखरब सुंदर विकसित केल्याबद्दलची माहिती दिली. याच प्रसंगी सहाययक वनसंरक्षक डी. एस. पवार, परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती मधुमीता यांचीही भाषणे झाली.त्यानंतर गोदेकाठी पक्षीनिरीक्षण करण्यात आले. 'या सप्ताहात सर्व पक्षी अभ्यासकांच्या सहकार्याने पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येईल'. असे सांगून संयोजक विजय होकर्णे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आज जन्मदिवस असलेल्या पक्षीअभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आलेख व त्यांच्या नांदेडमधील काही आठवणी सांगून उपस्थितांचे आभार मानले.

येथे क्लिक करा - नांदेड : शस्त्राचा धाक दाखवून वाटमारी करणारी टोळी जेरबंद- एलसीबी -

यांनी घेतले परिश्रम

या कार्यक्रमास सुरेश जोंधळे, हर्षद शहा, दिलीप ठाकूर, रवी डोईफोडे, डॉ. जगदीश देशमुख, पंकज शिरभाते, शिरीष गीते,  प्रा. शिवाजी जाधव, रवी डोईफोडे, सुषमा ठाकूर, सदा वडजे, सारंग नेरलकर, डॉ. अनिल साखरे, शैलेश कुलकर्णी, बालाजी वडजकर, संदीप सरसर,अविनाश हंबर्डे च्यासह नांदेड व परिसरातील पक्षीतज्ञ, अभ्यासक, हौशी निसर्ग छायाचित्रकारांनी उपस्थित राहून लाभ घेतला. भारत व महेश व अरुणा होकर्णे तसेच उमाकांत जोशी, लक्ष्मण संगेवार, निसर्गप्रेमी डॉ. प्रमोद देशपांडे, आनंदीदास देशमुख, महेश शुक्ला यांनी केले होते.

loading image