एसटी डेपो नांदेड आगार येथे बिरसा मुंडा यांची जयंती

प्रल्हाद कांबळे
Monday, 16 November 2020

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड जि.प. च्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, सोपान मारकवाड, केरबा जेठेवाड, आनंदा रेजीतवाड, संजय वाळवे, वर्षा येरेकर, डॉ. अभय दांडगे, मधुकर उन्हाळे, अमित कंठेवाड, डी.आर. पाटील, रावसाहेब पपुलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार येथे ता. १५ नोव्हेंबर  रविवार रोजी सकाळी ठिक ११ वाजता जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची १४५ वी जयंती कोविड-१९ चे शासन नियम पाळून सर्व एसटी कर्मचारी नांदेड आगाराच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड जि.प. च्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, सोपान मारकवाड, केरबा जेठेवाड, आनंदा रेजीतवाड, संजय वाळवे, वर्षा येरेकर, डॉ. अभय दांडगे, मधुकर उन्हाळे, अमित कंठेवाड, डी.आर. पाटील, रावसाहेब पपुलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा आदेश पाळा कोरोना टाळा : दर्शनासाठी ही आहे नियमावली- जिल्हाधिकारी डॉ. विपीन -

सर्वप्रथम धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुजीत मरदोडे, आतिष तोटावार, गुणवंत मिसलवाड, संभाजी मंतेवाड, माधव सुरेवाड यांनी सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन हृदय सत्कार केला. यावेळी मंगाराणी अंबुलगेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात म्हणाल्या की, बिरसा मुंडा यांनी इंग्रजाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध बंड करुन आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिला. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी असून आपण सर्व एसटी कर्मचारी बांधव एकसंघ राहून प्रवाशी सेवेसोबतच सामाजिक कार्यात जास्तीत जास्त योगदान द्यावे असे प्रतिपादन केले.

यावेळी डी.आर. पाटील, मधुकर उन्हाळे, रावसाहेब पपुलवाड यांचे समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख वक्ते तथा सामाजिक कार्यकर्ते गुणवंत. मिसलवाड यांनी करुन बिरसा मुंडा यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला. सुत्रसंचालन नारायण नारेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सुजीत मरदोडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश कल्याणपाड, श्रीनिवास रेणके, शिवाजी निरडे, बाबुराव तरपेवाड, राजू घागरदरे, बाळासाहेब मोरे, विनोद हतागळे, रमेश सोने, जय कांबळे, आनंद कदम, सुनीता उपवाड, सुनीता पेरके, दौलत पाटील, निर्दोस पवार, राजेश गहीरवार, दिलीप कदम, शंकर जक्केवाड, विजय गायकवाड इत्यादींनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birsa Munda's birthday at ST Depot Nanded Depot nanded news