

BJP Saree Distribution Event
Esakal
नांदेडमध्ये भाजपने सेवा संकल्प अभियानाअंतर्गत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात भाजपने अंगणवाडी सेविका सन्मान म्हणून साड्यांचे वाटप केले. मात्र साडी वाटपावरून गोंधळ झाल्याची घटना घडलीय. साड्यांसाठी महिलांची मोठी गर्दी झाल्यानं गोंधळ निर्माण झाला आणि झटापट झाल्याचीही घटना घडलीय. या प्रकाराची सध्या चर्चा होत आहे.