esakal | 'आगामी देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही भाजपचा विजय'
sakal

बोलून बातमी शोधा

प्रताप पाटील चिखलीकर

'आगामी देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही भाजपचा विजय'

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कार्यकर्त्यांच्या बळावरच दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत विस्तारलेला भारतीय जनता पक्ष (BJP) हाच एकमेव पक्ष आहे. कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत बुथ संघटनेच्या बळावरच भाजपाने दाखवून दिली आहे. लोकसभेतील यशामुळे हुरळून न जाता कार्यकर्त्यांनी नांदेड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला बनविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर (MP Pratap Patil Chikhalikar) यांनी रविवारी (ता.२५) केले. भाजपने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान सुरु केले आहे. अभियानच्या आढावा बैठकीला भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्यासह नांदेड (Nanded) जिल्हा भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, महानगराध्यक्ष प्रविण साले, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड (MLA Tushar Rathod), महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे, ओबीसी मोर्चाचे (Obc Morcha) प्रदेश सरचिटणीस प्रदीप तांदळे, राम नागरे, माजी आमदार अविनाश घाटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चित्ररेखा गोरे, भाजपाचे सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्मणराव ठक्करवाड, डॉ. माधवराव उच्चेकर, शिवराज पाटील, डॉ. अजित गोपछडे, राम भारती महंत आदी उपस्थित होते.(bjp will win upcoming deglur biloli assmebly by election, said pratap patil chikhalikar glp88)

हेही वाचा: अल्पवयीन मुलांना पॉर्नचे आकर्षण, नोटिफिकेशन्सने लक्ष विचलित

श्री.चिखलीकर म्हणाले, कार्यकर्त्यांच्या बळावरच नांदेड जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला बनत आहे. धनशक्तीच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे काँग्रेसचे दिवस आता संपल्यात जमा झाले आहे. आगामी देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही भाजपचा विजय हा निश्‍चित आहे. जिल्ह्यात समर्थ बुथ अभियानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पक्षाने दोन हजार ३२२ बुथ संघटनेची मजबूत फळी निर्माण केली आहे. जिल्ह्यात ४६५ शक्ती केंद्राची रचना तयार करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपा पक्ष संघटनेची ताकद जोमाने वाढत आहे. समर्थ बुथ अभियान १७ सप्टेंबरपर्यंत चालणार असून मजबूत बुथ संघटना तयार करुन पक्षाला बळ देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहनही खासदार चिखलीकर यांनी केले आहे.

हेही वाचा: मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) संसदेत आवाज उठविण्यासाठी भाजपचा प्रत्येक खासदार सक्षम आहे. स्वत:च्या नाकर्तेपणावर पांघरुन घालण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आता भाजप खासदारांना पत्र देवून मराठा आरक्षणावर आवाज उठविण्याचा शहाणपणा सुरु केला आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाला सत्ता, संपत्तीचा माज आलेला आहे. निवडणूक आली की पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचे काँग्रेसचे दिवस आता संपले आहेत. जनाधार असलेला भाजप पक्ष आता मैदानात उतरला असल्याचेही खासदार चिखलीकर यांनी स्पष्ट केले केले आहे.

loading image
go to top