
भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी मज्जाव केला. मात्र काही वेळाने आतील गेटला टाळे ठोकुन निषेध व्यक्त केला.
नांदेड : महावितरण कंपनीच्या धोरणाविरोधात शुक्रवारी (ता. पाच) महानगर व जिल्ह्यात सहा ठिकाणी महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल करत कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. शहरातील आण्णाभाऊ साठे येथील महावितरणच्या कार्यालयासमोर भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी मज्जाव केला. मात्र काही वेळाने आतील गेटला टाळे ठोकुन निषेध व्यक्त केला.
महावितरण कार्यालयासमोर एक तास भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण व आघाडी शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अॅड. दिलीप ठाकूर प्रास्ताविक करताना आंदोलन करण्यामागची भूमिका विशद केली. महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी आपल्या भाषणातून आघाडी शासनाच्या बोलघेवडेपणाचा पर्दाफाश करुन यापुढे नांदेड शहरात कोणाचेही विद्युत कनेक्शन कट केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. माजी जिल्हाध्यक्ष अरविंद भारतीया, प्रदेश कार्यकारणी महिला मोर्चा सदस्य डॉ. शितल भालके, जिल्हा उपाध्यक्ष सुशील चव्हाण, ओबीसी मोर्चा अध्यक्ष व्यंकटेश जिंदम यांनी समयोचित भाषणे केली. महावितरणच्या निषेधार्थ गणेश नामोळे याने मुंडन करुन निषेध व्यक्त केला. तर महिला मोर्चाच्या सर्व सदस्यांनी काळे कपडे घालून वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
हेही वाचा - नांदेड : कारवाडी शिवारात बिबट्याने पुन्हा केले एका वघारीला फस्त; भीतीचे सावट कायम
विद्युत भवन समोरील आंदोलनात सरचिटणीस विजय गंभीरे, अशोक पाटील धनेगावकर, दिलीपसिंघ सोडी, कुणाल गजभारे, संदीप कर्हाळे, बागड्या यादव, नवल पोकर्णा, शततारका पांढरे, महादेवी मठपती, नलीनी जोशी, अनिल जगताप, मारोती वाघ, अनूराधा गीरम, राज यादव, अक्षय अमिलकंठवार, सुनिल पाटील, मनोज जाधव, संजय जालनेकर , संजय अंभोरे, श्रीराज चक्रावार, सिध्दार्थ कसबे, कामाची सरोदे, संभाजी साखरे, विलास दगडू, राजेश ठाकूर, दिपक चौधरी, संदिप छपरवाल, अरूण देव, सागर जोशी, कार्तीक दगडू, मनोज संमुंदर, संतोष गुजरे, अंबादास जोशी, अनिल गाजुळा, मंगेश चिखलीकर. विशाल शुक्ला किरणमोरेहे सहभागी झाले होते.
बर्की चौक येथे झालेल्या अंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख, बालाजी गिरगावकर, महेश खोमणे, भालचंद्र पत्की, अकबर खान पठाण, ओम बंडेवार,अमोल कुल्थिया, राजेश कपूर, आनंद बामलवा, सुजित कबरा, सोनू उपाध्याय, मुरली गजभारे यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
येथे क्लिक करा - खासदार चिखलीकर यांना धक्का; जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून बाद
तरोडा नाका येथील जंगमवाडी महावितरण कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात मिलिंद देशमुख, बंडू पावडे, आशिष नेरळकर, संतोष क्षिरसागर, प्रताप पावडे, चक्रधर कोकाटे, नंदु पावडे, संतोष परळीकर, संदीप पावडे, वाकोडिकर, भारत पाटील, साईनाथ कुट्टेकर, पुरुषोत्तम गाजरे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.