esakal | भाजपचे ध्येय धोरणं तळागाळापर्यंत पोहंचा- खासदार प्रताप पाटील चिखलीकर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या कार्यक्रमास भाजपा प्रदेश वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ.अजित गोपछडे, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, भाजपाचे महारानगराध्यक्ष प्रविण साले, भाजपा वैद्यकीय आघाडीचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.सचिन पाटील उमरेकर, संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ.कोकरे, हिंदू जागरण समितीचे डॉ.देगलूरकर,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाजपाचे प्रवक्ते प्रल्हाद उमाटे, मारोती वाडेकर आदिंची यांची उपस्थिती होती.

भाजपचे ध्येय धोरणं तळागाळापर्यंत पोहंचा- खासदार प्रताप पाटील चिखलीकर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड - भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणं समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोंहचवून नांदेड जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला निर्माण करण्यासाठी वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी जोमाने काम करावे असे आवाहन नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

नांदेड जिल्हा वैद्यकीय आघाडी शहर व ग्रामीणची कार्यकारिणी खा.चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर करुन पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळे ते बोलत होते. या कार्यक्रमास भाजपा प्रदेश वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ.अजित गोपछडे, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, भाजपाचे महारानगराध्यक्ष प्रविण साले, भाजपा वैद्यकीय आघाडीचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.सचिन पाटील उमरेकर, संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ.कोकरे, हिंदू जागरण समितीचे डॉ.देगलूरकर,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाजपाचे प्रवक्ते प्रल्हाद उमाटे, मारोती वाडेकर आदिंची यांची उपस्थिती होती.

माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यास संसदेत जाण्याचा बहुमान प्राप्त

खा.चिखलीकर म्हणाले, समाजाचा विश्‍वासू घटक असलेल्या डॉक्टर मंडळींनी निवडणूक काळात होकायंत्रासारखे काम करीत असतात, त्यांच्याकडे येणार्‍या तळागातील रुग्णांनामध्ये भाजपाचे ध्येय धोरण रुजविण्यासाठी वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी काम करावे. लोकसभेच्या निवडणुकीत महत्वाची कामगिरी बजावल्यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यास संसदेत जाण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या माजी खासदारांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात आपल्या भागातील प्रश्‍नावर चकार शब्द देखील काढले नाहीत.त्यामुळे मुका खासदार म्हणून अशोक चव्हाण यांची इतिहासात नोंद झाली असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

नांदेड-बिदर रेल्वे मार्गास तात्काळ मंजूरी देवून 2 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर


नांदेड जिल्ह्यातून भाजपाचा खासदार म्हणून तुम्ही सर्वांनी मला संसदेत पाठविले, त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेवून नांदेड-बिदर रेल्वे मार्गास तात्काळ मंजूरी देवून 2 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या एक वर्षाच्या कार्यकाळात आपला खासदार या नात्याने जिल्ह्यातील अनेक विकास कामांना मंजूरी प्राप्त करुन घेण्यासाठी संसदेच्या आधिवेशनात आवाज उठविल्यामुळे रेल्वेचे अनेक प्रश्‍न मार्गी लागले आहेत.

भाजपाचा बालेकिल्ला निर्माण करा


नांदेड जिल्ह्यात वैद्यकीय आघाडीने काम करीत असताना स्वत:ला एकटे असल्याचे समजू नये, तुमच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण जिल्ह्यातील भाजपा संघटना सर्व शक्तीनिशी तयार आहे. पक्षाचे काम करीत असताना वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकार्‍यांवर कोणतेही संकट आले तरी तुम्ही आम्हाला हाक द्या, तुमच्या हाकेला धावून येण्याचे आश्‍वासन तुमचा खासदार या नात्याने देतो असे सांगून ते म्हणाले, आगामी काळातील ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या निवडणूकी नांदेड जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला निर्माण करण्यासाठी वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी जोमाने काम करावे असे आवाहन खा.चिखलीकर यांनी यावेळी केले.

भाजपा संघटना मजबूत करण्याचे काम केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही


प्रारंभी भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अजित गोपछडे यांनी प्रास्ताविकात आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, वैद्यकीय आघाडीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे सक्षम नेतृत्व खा.चिखलीकर यांच्या रुपाने आम्हाला मिळाले त्यामुळे आगामी काळात वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी जोमाने काम करुन भाजपा संघटना मजबूत करण्याचे काम केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे


यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले, वैद्यकीय आघाडीचे महानगराध्यक्ष डॉ.सचिन पाटील उमरेकर, डॉ. देगलूरकर यांनी आपले विचार मांडले. नवनिर्वाचित वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकार्‍यांना खा.चिखलीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.