नांदेडमध्ये ‘सी.एच.बी.’ प्राध्यापकांनी दिल्या काळ्या शुभेच्छा

शिवचरण वावळे
Saturday, 5 September 2020

कोरोनामुळे अनेकांचे हाल सुरु आहेत. त्याला सी.एच. बी. प्राध्यापक तरी कसे अपवाद राहतील. ता. पाच सप्टेंबर हा डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण याचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. परंतू मागील काही महिण्यापासून शी.एच.बी. प्राध्यापकांचे हाल सुरु असल्याने त्यांनी शासन व संस्थाचालकांच्या आडमुठ्या धोरणाला विविध माध्यमातून विरोध सुरु केला आहे. 

नांदेड - महाराष्ट्रात प्रचलित सी. एच. बी. धोरण हे उच्च शिक्षितांचे शोषन करणारे धोरण ठरत आहे. सी.एच.बी. तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना वर्षाला साल गड्यापेक्षा कमी मानधन मिळते. यात मागील सहा महिन्यापासून मानधन देखील नाही. या मानधनावर उपजीविका करणे शक्य नाही. या मानधनात पुस्तक घ्यायचे का भाकर? हा मोठा प्रश्न सी.एच.बी. तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना पडला आहे. परिणामी देशभरात पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा होत असताना सी.एच.बी. प्राध्यापकांनी हातात फलक घेऊन शिक्षक दिनाच्या काळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यभरात जवळपास वीस हजार प्राध्यापक सी. एच. बी. तत्वावर काम करत आहेत. यापैकी शनिवारी (ता.पाच) दोन हजार प्राध्यापक ‘काळा शिक्षक दिन’ आंदोलनात सहभागी झाले असल्याचे प्रा. डॉ. परमेश्‍वर पौळ यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या काळात शाळा व महाविद्यालये अद्यापही सुरु झालेली नाहीत. २४ मार्चपासून प्राध्यापकांनी महाविद्यालयाची पायरी देखील ओलांडलेली नाही. दरम्यान अनेक सी.एच.बी. प्राध्यापकांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. 

हेही वाचा-Video- शिक्षक दिन विशेष : निवृत्त शिक्षकाचा असाही छंद ​

शासन - संस्थाचालकांच्या आडमुठ्या धोरणा निषेध 

सीएचबी तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना तुटपुंजा पगार काम करावे लागत असताना, तेही वेळेवर मिळत नसल्याने संसाराचा गाडातरी कसा हाकावा? असा गहण प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. घराचे, एलआयसीचे हप्तेही थकलेले आहेत. मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न आहेच.   त्यामुळे या प्राध्यापकांमध्ये शासनाच्या शिक्षण धोरणासह संस्थाचालकांच्या आडमुठ्या धोरणा बद्दल प्रचंड रोष आहे. सध्या कोरोनामुळे शिक्षकांना घराबाहेर पडता आले नसले तरी, अनेक शिक्षकांनी घरात राहुन काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग घेतला.

हेही वाचा- नांदेड- राज्यातील एसटी चालक-वाहक महिला न्यायाच्या प्रतिक्षेत ​

शासनाने धोरण बंद करावे
महाराष्ट्र शासनाने हे धोरण बंद करुन यू.जी.शी.च्या नियमानुसार शंभर टक्के भरती करावी. या धोरणाचा निषेध करण्यासाठी आजचा शिक्षक दिन आम्ही काळा शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत 
- प्रा.डॉ. परमेश्वर पौळ, राज्य समन्वयक, नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black Wishes From ‘CHB’ Professors In Nanded Nanded News