esakal | नांदेड- राज्यातील एसटी चालक-वाहक महिला न्यायाच्या प्रतिक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कर्तव्यावर घेण्याची तयारी गुरुवारी (ता.तीन) महामंडळातर्फे केली आहे. पण चालक कम वाहक महिला प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एसटी कामगार संघटना लढा उभारणार का? 

नांदेड- राज्यातील एसटी चालक-वाहक महिला न्यायाच्या प्रतिक्षेत

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड ः  राज्यातील रोजंदार गट क्रमांक एक वरील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कर्तव्यावर घेण्याची तयारी गुरुवारी (ता.तीन) महामंडळातर्फे केली आहे. पण चालक कम वाहक महिला प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एसटी कामगार संघटना लढा उभारणार का? असा प्रश्‍न महिला कामगारांना पडला आहे. 

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लॉकडाउनची घोषणा झाली. या दरम्यान राज्‍य परिवहन महामंडळाची प्रवाशी सेवा जवळपास दोन महिने ठप्प होती. यामुळे महामंडळाचे आर्थिक स्त्रोत पूर्णपणे ठप्प झाले होते. लॉकडाउन सुरु झाल्याने प्रवाशी वाहतूक सेवा सुरळीत होईपर्यंत प्रशासनाने आर्थिक खर्चात काटकसर म्हणून वाहतुकीसाठी आवश्यकतेपेक्षा अतिरिक्त कर्मचारी म्हणून २३६ चालक व वाहक महिलांची भर्ती केली. शिवाय इतर पदांमध्ये रोजंदार गट क्रमांक एकमध्ये जवळपास एक हजार ४०० जणांची नेमणूक केली आहे.  

हेही वाचा- नांदेड-  महावितरण कंपनीच्या बदनामी मागे कुणाचा हात, विज ग्राहकावर दुहेरी संकट, कसे? ते वाचाच ​

गट एक मधील कर्मचाऱ्यांचा पुन्हा संधी

यातील रोजंदारी गट क्रमांक एक मधील अनेक पदावरील कर्मचारी, अनुकंपावरील प्रशिक्षणार्थी यांच्यासह चालक कम वाहक या पदाचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिला प्रशिक्षणार्थी यांच्यावर अन्याय झाला होता. मात्र गुरुवारी गट क्रामांक एक मधील कर्मचाऱ्यांचा पुन्हा नौकरीत येण्याचा मार्ग मोकळा करुन त्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे एक हजार ४०० कर्मचारी यांना फायदा होणार आहे. तर दुसरीकडे मोठा गाजावाजा करुन महामंडळात दुष्काळी भागात रोजगाराच्या नव्या संधी म्हणून सरळसेवा भरतीद्वारे मागील वर्षी नेमणुका करण्यात आल्या होत्या. 

हेही वाचा- स्वॅब देण्यासाठी आलेल्या नागरिकांचे हाल  प्रशासनाचे दुर्लक्ष; महिला, मुलांची कुचंबना

प्रशिक्षणार्थी महिलांचा न्याय हक्कावर गदा 

दरम्यान महिला चालक - वाहकांना प्रशिक्षण सुरु असतांनाच त्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. या विरोधात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भयांनी प्रशिक्षणार्थी चालक कम वाहक महिलांना कामावर घेण्यासाठी परिवहन मंत्री यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल द्वारे निवेदन देवून या महिलांच्या न्याय हक्काचा लढा उभारला आहे. मात्र गुरुवारी काढलेल्या परिपत्रकात या प्रशिक्षणार्थी महिलांचा समावेश न झाल्यामुळे त्यांच्या न्याय हक्कावर गदा आलेली आहे.

निर्भयाचा हा लढा सुरुच राहील
प्रतिकूल परिस्थितीत वेगळ्या क्षेत्रात झेप घेऊ इच्छिणाऱ्या चालक- वाहकांचा समावेश या परिपत्रकात करण्यात आला नाही. त्यामुळे या महिला चालक कम वाहकावर आभाळ कोसळले आहे. या प्रशिक्षणार्थी कामगारांना न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे केली आहे. प्रशिक्षणार्थी महिलांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र एसटी कामगार संघटना व निर्भयाचा हा लढा सुरुच राहील.
- शीला नाईकवाडे, राज्य महिला संघटक
 

loading image