Medical Scam: देगलूर तालुक्यात बोगस वैद्यकीय पथकाचा पर्दाफाश; बोगस वैद्यकीय पथक उध्वस्त
Deglur News: बेबंरा, मानूर आणि सोमुर गावकऱ्यांनी बोगस वैद्यकीय उपचार करणाऱ्या पथकाला धाडले. तपासणीच्या नावाखाली जमा केलेली जवळपास दोन लाख रुपयांची रक्कम रुग्णांना परत मिळवून दिली.
देगलूर : गुडघेदुखी, हाता पायांच्या आजारावर कमी खर्चात उपचार करण्याच्या नावाखाली लातूर येथून आलेल्या एका वैद्यकीय पथकाचा जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे उपचारापूर्वीच त्यांना गावातून पलायन करण्याची वेळ आली.